ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

पानकन्हेरगाव शिवारात जुगार अड्ड्यावर सेनगाव पोलिसांचा छापा:तिघे ताब्यात पाच जण फरार, 1.78 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सेनगाव तालुक्यातील पानकन्हेरगाव शिवारात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सेनगाव पोलिसांनी शुक्रवारी ता. 19 सायंकाळी छापा टाकला. यामध्ये तीन जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले, तर पाच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी या कारवाईत रोख रक्कम, तीन दुचाकी, तीन मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 1.78 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आठ जणांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालु्क्यातील पानकन्हेरगाव शिवारातील अनिल जाधव यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाखाली काही इसम झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, जमादार राजीव जाधव, सुभाष चव्हाण, जैस्वाल यांच्या पथकाने शुक्रवारी ता. 19 सायंकाळी शेतात जाऊन छापा टाकला. यामध्ये आठ जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिस आल्याचे लक्षात येताच जुगाऱ्यांमध्ये पळापळ सुरु झाली. यामध्ये पाच जण फरार झाले तर तिघे जण पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी घटनास्थळावरून 14 हजार रुपये रोख, तीन दुचाकी, तीन मोबाईल, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा 1.78 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जमादार तुकाराम मारकळ यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी अशोक हेंद्रे, अमोल राऊतकर, शंकरराव देशमुख, अनिल जाधव, कैलास जाधव, प्रविण वाठोरे, बाबाराव मनोहर बांगर, घनश्याम दायमा (रा.पानकनेरगाव) यांच्या विरुध्द गुन्हा केला आहे,. जमादार राजीव जाधव पुढील तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर