ब्रेकिंग न्यूज
⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान ✦ ⚡ तक्रार द्यायला आलेली महिला, पोलिसानं तिथंच ओळख काढली, साताऱ्यात थेट निलंबनाची कारवाई, काय घडलं? ✦ ⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती ✦ ⚡ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’वर बडगा; धडक मोहीम सुरू! ✦ ⚡ IND vs NZ 2nd ODI : पावसाची रिमझिम पण टॉस जिंकून टीम इंडियाची बॉलिंग, सिराजला ‘नो एन्ट्री’, पाहा दोन्ही संघ… ✦ ⚡ Success Story : शेतात लावली 350 झाडी, सोलापूरच्या शेतकऱ्याला 7 लाख निव्वळ नफा, असं काय केलं? ✦ ⚡ पाच मुलांचा बाप, विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नको ते केलं अन् शेवट भयंकर, छ. संभाजीनगरच्या घटनेनं…
SP News Maregaon

आरक्षण उपवर्गीकरण- डॉ. चलवादींचे सुवर्णमध्य काढण्याचे आवाहन:दलित समाजात फूट नको, बौद्ध समाजावर अन्याय टाळावा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत सध्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. हुलगेश चलवादी यांनी या मुद्द्यावर सर्वसमावेशक आणि समतोल विचार करण्याचे आवाहन केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे सर्वेसर्वा तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षणाचा लाभ समाजातील शेवटच्या आणि अत्यंत वंचित घटकांपर्यंत पोहोचावा, असे पक्षाचे मत आहे. मात्र, उपवर्गीकरणामुळे दलित समाजात फूट पडेल, ही भीती दूर करण्याची गरज असल्याचे डॉ. चलवादी म्हणाले. यासोबतच, बौद्ध समाजावर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी, अशी पक्षाची भूमिका आहे. राज्यात अनुसूचित जातीमध्ये एकूण ५९ जातींचा समावेश आहे. काही जातींना आरक्षणाचा चांगला फायदा झाला आहे, तर ज्या जातींमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, त्या आरक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून काहीशा दूर राहिल्या आहेत. याच वस्तुस्थितीमुळे मातंग समाजाकडून उपवर्गीकरणाची मागणी सातत्याने केली जात आहे. ही मागणी पूर्ण करताना आंबेडकरी अनुयायांची आणि प्रामुख्याने बौद्ध समाजाची भावनाही समजून घेणे महत्त्वाचे आहे. बौद्ध समाजाने गेल्या काही दशकांत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. शिक्षण आणि जागृतीमुळेच हा समाज पुढे जाऊ शकला आहे. त्यामुळे उपवर्गीकरणाचा कोणताही निर्णय घेताना या प्रगत घटकांवर अन्याय होता कामा नये, ही आमची आग्रहाची भूमिका असल्याचे डॉ. चलवादी यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून हक्क मिळवून दिले आहेत. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना समाजातील शेवटच्या, अत्यंत मागास घटकाला न्याय मिळालाच पाहिजे, पण तो न्याय मिळवताना संपूर्ण समाज सोबत असला पाहिजे. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने घाईघाईने कोणताही निर्णय न घेता समाजातील सर्व घटकांच्या, विविध संघटनांच्या आणि तज्ज्ञांच्या सूचनांचा व भावनांचा सखोल विचार करावा. कोणत्याही घटकावर अन्याय न करता, सर्वसमावेशक आणि समतोल मार्ग कसा काढता येईल, यावर सरकारने गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन डॉ. चलवादी यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर