ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शिंदेंच्या शिवसेनेसह अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होणार:संजय राऊत म्हणाले- सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश मोदी-शहांचे गुलाम

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सुनेत्रा पवार यांचा पक्ष वेगळा आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांचे सहकारी होते. ते सुनेत्रा पवारांचे सहकारी असतीलच असे नाही. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत गोष्टीवर दुसऱ्या पक्षाने का बोलावे. त्यांनी पत्रात काय लिहले हा त्यांचा विषय आहे. भविष्यात हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपमध्ये विलीन होईल, त्यासोबतच शिंदेंचेही 25 ते 30 आमदार भाजपमध्ये विलीन होतील, त्यांची तशी मानसिकता आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, त्या आमदारांना काळी काळ थांबवण्यासाठी सांगण्यात आले आहे. या दोन्ही पक्षाला भाजपमध्ये विलीन व्हावेच लागेल. शिवसेना पक्ष-चिन्हावरील सुनावणी प्रत्येकवेळी पुढे ढकलली जाते. मग सुप्रीम कोर्टावर विश्वास कोण ठेवणार? 50-50 वेळा घटनात्मक पीठ असलेल्या खटल्याच्या सुनावण्या पुढे ढकलल्या जातात. हे काम मुख्य न्यायाधीश करतात. हे नरेंद्र मोदी, अमित शहांचे गुलाम झाले आहे. या प्रकरणी एकदाच निर्णय देता येत नाही का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टावरच संशय संजय राऊत म्हणाले की, न्याय व्यवस्था ही राजकारण्याच्या दबावाखाली आहे. तसे नसते तर गौतम अदानींच्याविरोधात इतके खटले सुप्रीम कोर्टात गेले आणि एकाही खटल्यात ते हरले नाही. शिवसेना,
राष्ट्रवादीच्या सुनावणीसंदर्भात विचार केला तर ते गंभीरपणे घेतले जात नाही. न्यायाधीशांना दबाव असेल तर सांगितले पाहिजे. यावर काहीतरी उत्तर मिळावे म्हणून आम्ही कोर्टात गेलो आहोत. निवडणूक आयोगावर संशय घेता येत नाही असे म्हणणाऱ्या सुप्रीम कोर्टावरच संशय यायला लागला आहे. संविधानिक संस्थेवरच लोकांना संशय येत आहे. अनेक राज्यात बोगस मतदान झाले. त्याच पद्धतीने पश्चिमबंगालमध्ये होणार. नाहीतर कोण एकनाथ शिंदे त्यांचे इतके उमेदवार कसे विजयी होतात. विधान परिषदेवर उद्धव ठाकरेंचं बोलतील संजय राऊत म्हणाले की, आमच्या पक्षासंदर्भातील निकाल पुढे ढकलले जात आहेत कारण सर्वांना माहिती आहे की पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्ष आणि चिन्ह शिंदे गट आणि अजित पवार गटाला मिळूच शकत नाही. एकतर ते स्थगित होईल. किंवा आम्हालाच मिळेल. फुटीर गटाच्या बाजूने निर्णय असता तर आतापर्यंत निकाल लागला असता. हे लोकं भाजपमध्ये विलीन होतील. विधान परिषद निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंनी पु्नहा विधान परिषदेत जावे ही आमची इच्छा आहे. पण त्यावर उद्धव ठाकरेंच बोलतील. ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही आमची इच्छा आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर