ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

कुटुंब रस्त्यावर, मी पार उद्धवस्त झालो!:माझ्यावर टार्गेट करून अन्याय झाला, सतीश भोसले उर्फ खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बीड न्यायालयाने सतीश उर्फ खोक्या भोसले याला हत्येचा प्रयत्न प्रकरणात निर्दोष ठरवून मोठा दिलासा दिला आहे. एक वर्ष कारागृहात राहिल्यानंतर त्याची सुटका झाली असून या निर्णयामुळे जिल्ह्यात चर्चा रंगल्या आहेत. न्याय देवतेने मला न्याय दिला, असे म्हणत त्याने दिलासा व्यक्त केला. तसेच, मला जाणीवपूर्वक संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका नेत्याला लक्ष्य करण्यासाठी आदिवासी समाजातील मला टार्गेट करण्यात आले, असेही त्याने म्हटले आहे. सुमारे वर्षभरापूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावर ढाकणे पिता-पुत्रावर हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी त्याला अटक करून छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात ठेवले होते. दीर्घ सुनावणीनंतर बीड न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे भोसले याला या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर काल त्याची अधिकृत सुटका झाली आणि आज तो कारागृहाबाहेर आला. दरम्यान, भोसले याच्याशी संबंधित आणखी एक प्रकरणही चर्चेत आहे. एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा त्याचा व्हिडिओ काही काळापूर्वी व्हायरल झाला होता. या घटनेप्रकरणी त्याच्यावर वेगळा गुन्हा दाखल असून तो सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्या प्रकरणात भोसलेला जामीन मिळालेला आहे. त्यामुळे हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपातून मुक्तता मिळाली असली तरी इतर प्रकरणांमुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरूच आहे. काही लोक वातावरण बिघडवत असल्याचा आरोप न्यायालयाच्या निर्णयानंतर भोसलेने माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. न्याय देवतेने मला न्याय दिला, असे म्हणत त्याने दिलासा व्यक्त केला. तसेच, मला जाणीवपूर्वक संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका नेत्याला लक्ष्य करण्यासाठी आदिवासी समाजातील मला टार्गेट करण्यात आले, असा आरोपही त्याने केला. पुढे बोलताना त्याने कुटुंबावर तीन वेळा हल्ले झाल्याचा दावा केला. आयुष्यभराची कमाई लावून उभारलेलं घर पाडण्यात आलं. गेल्या एका वर्षात माझ्या कुटुंबाने खूप त्रास सहन केला, असेही सांगितले. जिल्ह्यातील जातीयवाद आणि राजकीय वैमनस्यामुळे काही लोक वातावरण बिघडवत असल्याचा आरोप करत भोसलेने या प्रकरणाला वेगळं वळण दिलं आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर