ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

सातारा ZP मध्ये भाजप, NCP चे प्रत्येकी 2 सभापती:बंडखोर सदस्यांमुळे बिनविरोध निवड, पोलिसांचा आडमुठेपणा कायम

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी झालेल्या राड्यानंतर आज 4 सभापतींची निवड प्रक्रिया पार पाडली. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर जिल्हा परिषद सदस्यांमुळे बिनविरोध झाली. यावेळीही पोलिसांनी केवळ पत्रकारच नव्हे तर जिल्हा परिषद सदस्यांविषयीही आपला आडमुठेपणा दाखवला. सातारा जिल्हा परिषदेत आज समाज कल्याण सभापती, महिला व बालकल्याण सभापती तथा दोन विषय समित्यांच्या सभापतीची निवड प्रक्रिया पार पडली. त्यात समाज कल्याण सभापतीपदी भाजप सदस्य ऋषिकेश धायगुडे यांची निवड झाली, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी राष्ट्रवादीच्या ऋतुजा शिंदे यांची निवड झाली. याशिवाय विषय समित्यांच्या सभापतीपदी भाजपच्या तेजस्विनी कदम व राष्ट्रवादीच्या लता कर्णे यांची निवड झाली. तत्पूर्वी, कालपासून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई व संदीप मांडवे हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण आज हे दोघेही काळ्या फिती लावून शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्यांसोबत एकत्र आले. पण राष्ट्रवादीचे सदस्य कामेश कांबळे ऐनवळी गैरहजर राहिले. त्यामुळे अनिल देसाई व संदीप मांडवे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. शिवसेना – राष्ट्रवादीने केला निषेध दुसरीकडे, जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य फोडल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे पक्षाच्या सदस्यांनी सभापती निवडीच्या वेळी दंडाला काळ्या फिती बांधून आपला निषेध व्यक्त केला. या सर्वांनी निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. त्यानंतर ते आपला निषेध नोंदवण्यासाठी जिल्हा परिषद इमारतीच्या पायऱ्यांवर ठाण मांडून बसले होते. यावेळी त्यांनी पोलिसांच्या आडमुठेपणाविरोधातही जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते जमावबंदीचे आदेश उल्लेखनीय बाब म्हणजे सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याचे राज्य विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले होते. या घटनेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दुखापत झाली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यामुळे आजच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत ह्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी खबरदारी म्हणून जमावबंदीचे आदेश जारी केले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर