ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

DGCA चा अंतिम अहवाल पुढच्या वर्षी द्या:प्रथम अजितदादा विमानात बसतानाचे CCTV फुटेज दाखवा, अमित मिटकरींना घातपाताचा संशय

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शनिवारी पुन्हा एकदा दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी आपला अहवाल पुढच्या वर्षी द्यावा, पण प्रथम अजित पवार विमानात बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी सर्वच तपास यंत्रणा फेल ठरल्याचाही दावा केला आहे. अजित पवार यांचा गत 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या एका विमानात अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या आमदारांनी असा दावा केला आहे. त्यात प्रामुख्याने रोहित पवार व अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करून तपास यंत्रणांवरील दबाव वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर मिटकरी यांनी शनिवारी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे अजित पवार यांचा अपघात नव्हे तर घातपातच असल्याचा दावा केला आहे. काय म्हणाले आमदार अमोल मिटकरी? अमोल मिटकरी आज एका पोस्टमध्ये म्हणाले, अजितदादा विमान दुर्घटना प्रकरणात महाराष्ट्रातील जनतेला शंका असणारे कटाचे मुख्य सूत्रधार, सुमित कपूर, साहिल मदन, यश व यांचा बाप VK सिंग कुठाय तेही नंतर सांगा? DGCA चा अंतिम अहवाल व ब्लैक बॉक्स डेटा वाटल्यास पुढच्या वर्षी द्या निदान दादा विमानात बसतानाचा CCTV फुटेज तर महाराष्ट्रासमोर येऊ द्या. मिटकरी यांनी हे ट्विट मुंबई पोलिस व केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयलाही टॅग केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी अजित पवारांच्या अपघाताचा तपास करणाऱ्या सर्वच तपास संस्था अपयशी ठरल्याचा दावा केला आहे. प्रस्तुत फोटोत नमूद करण्यात आले आहे की, 28 जानेवारीनंतर या एक महिना 11 दिवसांत अजितदादांच्या अपघाताविषयी एकही ठोस पुरावा न देऊ शकलेले फेल इन्व्हेस्टिगेशन कंपनी. एफआयआर न घेऊ शकलेले फेल पोलिस. व्ही के सिंगला सपोर्ट करणारी फेल सीआयडी. आंतरराष्ट्रीय चौकशी नाकारणारे फेल सरकार. सीसीटीव्ही फुटेज नाही. ब्लॅक बॉक्स जळाला. ऑल इन्व्हेस्टिगेशन आर आर फेल हेअर. जनतेचा आवाज दाबणारे सगळे फेल. शेमफूल प्रोसेस. विधिमंडळात चर्चा होत नसल्यावर नाराजी उल्लेखनीय बाब म्हणजे अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या अपघातावर विधिमंडळात चर्चा करण्यात होणाऱ्या दिरंगाईवरही नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात झाला, याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र हा विषय अद्याप सभागृहात चर्चेसाठी आला नाही. ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. सभागृहात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन किंवा अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून हा विषय मांडला जाऊ शकतो. त्या चर्चेतूनच सत्य समोर येईल आणि ते नोंदवहीतही येईल. मात्र पहिल्याच अधिवेशनात या विषयावर चर्चा न होणे खेदजनक आहे, असे ते म्हणाले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर