ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

मोदींनी भारताचे सार्वभौमत्व परकीय शक्तींना विकले:प्रकाश आंबेडकरांचा घणाघात, परराष्ट्रीय धोरणांवर केला जोरदार हल्लाबोल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचे सार्वभौमत्व परकीय शक्तींना विकले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत सध्या सुरू असलेल्या भारताच्या परराष्ट्रीय धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, 8 जानेवारी 2025 रोजीच्या माझ्या निवेदनात, अमेरिकेतून ‘तेजस’ विमानांच्या इंजिनांच्या आयातीस झालेल्या दोन वर्षांच्या विलंबामुळे, या स्वदेशी विमानाचे उत्पादन वेळेवर होण्यास होत असलेल्या विलंबाकडे मी लक्ष वेधले होते. मी यावर जोर दिला होता की, हा आयातीतील विलंब अमेरिकेने हेतुपुरस्सर घडवून आणला आहे. 99 पैकी केवळ 6 इंजिन वितरित पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले, काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) तेजससाठी इंजिन वितरणास विलंब केल्याबद्दल जीई एरोस्पेसवर दंड आकारला. एचएएलने एकूण 99 इंजिनची मागणी केली होती, परंतु आतापर्यंत त्या 99 पैकी केवळ 6 इंजिन वितरित करण्यात आले आहेत. अमेरिकेचे राफेलवर नियंत्रण 20 फेब्रुवारी, 2026 रोजीच्या माझ्या दुसऱ्या निवेदनात, मी यावर प्रकाश टाकला होता की, राफेलसाठी तयार होणाऱ्या आणि भारतात निर्यात केल्या जाणाऱ्या भागांच्या भविष्यातील खरेदीमध्ये अमेरिकन सरकारने ‘पडद्याआड’ कसा प्रभाव मिळवला आहे. राफेल करारापूर्वी, अमेरिकेतील लोअर ग्रुपने फ्रान्सच्या एलएमबी एरोस्पेसचे अधिग्रहण केले होते, जी राफेलच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि रडारसाठी महत्त्वपूर्ण कूलिंग फॅन आणि मोटर्स बनवते. पूर्वी, एक फ्रेंच कंपनी असल्याने, तिच्या निर्यातीसाठी अमेरिकेच्या मंजुरीची आवश्यकता नव्हती. आता, अमेरिकेच्या मालकीखाली आल्यामुळे, हे भाग अमेरिकेच्या निर्यात नियंत्रणाखाली येऊ शकतात, ज्यामुळे अमेरिकेला राफेलच्या सुटे भागांवर आणि दुरुस्तीवर संभाव्य प्रभाव टाकण्याची संधी मिळेल, अशी चिंता प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. UAEने तडजोड केली नाही, पण मोदींनी केली तेजस विमानांच्या इंजिन पुरवठ्यात अमेरिकेने केलेला ‘जाणूनबुजून’ केलेला विलंब राफेलच्या बाबतीतही पुन्हा होण्याची दाट शक्यता असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. ते म्हणाले, काल फ्रान्सने यूएईला राफेल लढाऊ विमानाचे तंत्रज्ञान देण्यास नकार दिल्यामुळे, यूएईने राफेलच्या एफ-5 व्हेरिएंटच्या विकासासाठी सुमारे 3.5 अब्ज युरोचा निधी देण्यापासून माघार घेतली. पण, मोदींनी राफेलच्या सोर्स कोडशिवायच फ्रान्ससोबत 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा 3.25 लाख कोटी रुपयांचा करार केला. यूएईने तडजोड केली नाही, पण मोदींनी केली, अशी टीका आंबेडकरांनी केली. भारतीय हवाई दलाला राफेलच्या सोर्स कोडमध्ये प्रवेश नाही पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, 19 फेब्रुवारी 2026 रोजीच्या माझ्या निवेदनात, मी असा इशारा दिला होता की, भारतीय हवाई दलाला राफेलच्या सोर्स कोडमध्ये प्रवेश नसल्यामुळे, ते नवीन पाकिस्तानी किंवा चीनी रडार सिग्नेचरचा समावेश करण्यासाठी राफेलच्या थ्रेट लायब्ररी स्वतंत्रपणे अद्ययावत करू शकत नाही, जी अलीकडील भारत-पाकिस्तान संघर्षात पाकिस्तानविरुद्ध एक गंभीर सामरिक अडचण होती. लढाऊ विमानांच्या ‘चाव्या’ परकीय राष्ट्रांच्या हाती या सर्वाचा अर्थ असा होतो की, भारत जो आतापर्यंत आपल्या सुरक्षेशी संबंधित निर्णय स्वतःच घेत आला आहे. त्याच्या लढाऊ विमानांच्या ‘चाव्या’ (म्हणजेच इंजिने, प्रमुख सुटे भाग आणि सोर्स कोड) परकीय राष्ट्रांच्या हाती असणे, ही भारताच्या लष्करी कारवायांच्या स्वायत्ततेसाठी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी, स्वातंत्र्यासाठी आणि सार्वभौमत्वासाठी एक अत्यंत गंभीर जोखीम असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मोदी ‘राफेल’ विमाने का खरेदी करत आहेत? प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी माझा प्रश्न पुन्हा उपस्थित करतो, मोदी ‘राफेल’ विमाने का खरेदी करत आहेत, रशियन बनावटीची ‘Su-57E’ विमाने का नाही? मोदींनी स्वतःला अमेरिकेच्या हाती विकून टाकले आहे. मोदींनी भारताचे सार्वभौमत्व परकीय सत्तांच्या हाती विकून टाकले आहे, असा घणाघात आंबेडकरांनी केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर