ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

भोंदू अशोक खरातचा लँड रॅकेट उघड!:60 लाखांची जमीन 22 लाखात बळकावली, एजंटांसह महसूल अधिकारीही आता ‘SIT’च्या रडारवर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकचा भोंदू अशोक खरातने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर भोंदुगिरी आणि हवाला रॅकेट उघड झाले. आता अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे थेट जमीन बळकावण्याच्या मोठ्या रॅकेटपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे आता विशेष तपास पथकाच्या रडारवर मोठे जमीन खरेदी-विक्री एजंट, नाशिक-पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल अधिकारी आले असून त्यांची कसून चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एका फिर्यादीची 60 लाख रुपये किमतीची जमीन केवळ 22 लाख रुपयांत बळकावल्याप्रकरणी अशोक खरात याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या फसवणुकीत एका एजंटची भूमिका कळीची ठरली आहे. संबंधित एजंटनेच खरात आणि फिर्यादीची ओळख करून दिली होती आणि खरातच्या भोंदूगिरीला खतपाणी घालत फिर्यादीची दिशाभूल करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे तपासात समोर आले आहे. अशोक खरातच्या या जमीन घोटाळ्यात केवळ खासगी एजंटच नव्हे, तर नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील काही महसूल अधिकारीही सामील असल्याचा संशय एसआयटीने व्यक्त केल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. नियमांना बगल देऊन जमिनीचे फेरफार करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे किंवा कायदेशीर पळवाटा शोधून देण्यात या अधिकाऱ्यांनी खरातला नेमकी कशी मदत केली, या दृष्टीने आता एसआयटीने आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे. महसूल अधिकाऱ्यांचीही होणार चौकशी एसआयटीने अशोक खरातच्या बँक खात्यांची आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी केली असता अनेक जमीन ब्रोकर्ससोबतचे मोठे संशयास्पद व्यवहार उघड झाले असून, या जमीन व्यवहारांचा वापर ‘ब्लॅक मनी’ पांढरा करण्यासाठी करण्यात आला असावा असा दाट संशय व्यक्त केला जात आहे. या घोटाळ्यात नाशिकसह इतर जिल्ह्यांतील एजंट आणि कोणत्या सरकारी महसूल अधिकाऱ्यांनी खरातला सहकार्य केले, तसेच अशाच पद्धतीने आणखी किती जणांची फसवणूक झाली, या दिशेने आता तपासाची चक्रे फिरत आहेत. त्यामुळे आगामी काळात जमीन खरेदी-विक्री करणारे एजंट आणि महसूल अधिकाऱ्यांच्या चौकशीतून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर