ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

मंत्री उदय सामंतांच्या पत्नीसाठी अख्खी यंत्रणा कामाला:नेते आता कलाकारांचे क्षेत्रही बळकावणार का? विरोधकांचा सवाल

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, यावेळची लढत केवळ कलाकारांपुरती मर्यादित न राहता त्यात आता राजकीय ‘हायव्होल्टेज’ ड्रामा सुरू झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत थेट उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांच्या पत्नी नीलम सामंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मंत्री उदय सामंत यांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा दावा अंधारे यांनी केल्याने चित्रपट वर्तुळासह राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुषमा अंधारे यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट लिहीत म्हटले आहे की, “मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम उदय सामंत यांची निवड व्हावी यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. विजय पाटकर यांच्यासारख्या अत्यंत ज्येष्ठ अभिनेत्याला सुद्धा अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती मिळते आहे, जी अतिशय गंभीर आहे. नेते जोपर्यंत अभिनेत्यांसारखे वावरतात तिथपर्यंत ठीक आहे; पण नेते जर आता अभिनेत्यांचे हक्काचे कलाक्षेत्रही बळकावणार असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे.”
विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर टीका अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील राजकीय हस्तक्षेपानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून दडपशाही केली जातेय, याचे उत्तम उदाहरण ही निवडणूक आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर आरोप केला आहे. तर एका मंत्र्याची बायको चित्रपट महामंडळाची निवडणूक लढतेय, मंत्र्यांचा ओएसडी फोन करून धमकावत असेल तर मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. यासोबतच कलाक्षेत्रातील लोकांचा आवाज दाबला जात असले तर आम्ही त्या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
विजय पाटकर विरुद्ध मेघराज भोसले वाकयुद्ध विकोपाला या निवडणुकीत यंदा अभिनेते विजय पाटकर विरुद्ध मेघराज भोसले अशी थेट आणि चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ऐनवेळी आपल्याला उमेदवारी अर्ज भरू दिला नसल्याचा गंभीर आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी केला. पाटकरांच्या या आरोपानंतर महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज भोसले यांनी त्यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत पलटवार केला. “विजय पाटकर हा चित्रपटसृष्टीला कलंक आहे. तो अभिनयात चांगला आहे, पण लबाडीमध्ये एक नंबर आहे,” अशा शब्दांत भोसले यांनी पाटकरांवर तोफ डागली. निवडणुकीला नवे वळण एकीकडे विजय पाटकर आणि मेघराज भोसले यांच्यातील वैयक्तिक वाद आणि आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले असतानाच, आता सुषमा अंधारे यांनी यात उडी घेतल्याने या निवडणुकीला पूर्णपणे राजकीय वळण मिळाले आहे. महामंडळाच्या निवडणुकीत थेट मंत्र्यांच्या कुटुंबाचा हस्तक्षेप आणि सरकारी यंत्रणेच्या कथित दबावाचा मुद्दा समोर आल्यामुळे आगामी काळात यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर