ब्रेकिंग न्यूज
Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार
SP News Maregaon

खरात प्रकरणात पोलिस आयजींचं नाव समोर:अंजली दमानियांचा व्हिडीओतून गंभीर आरोप; भोंदूबाबा प्रकरणात पोलिस यंत्रणेलाही फटका

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. आतापर्यंत राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा होत असलेल्या या प्रकरणात आता थेट पोलिस प्रशासनालाही धक्का बसला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या नव्या खुलाशामुळे प्रकरणात मोठी खळबळ उडाली असून, खरात आणि प्रशासन यांच्यातील संबंधांबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अंजली दमानिया यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत दत्ता कराळे हे अशोक खरात यांच्या कार्यक्रमात उपस्थित असल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये स्पष्टपणे विचारले की, इतक्या वरिष्ठ पदावर असलेले पोलिस अधिकारी अशा वादग्रस्त व्यक्तीच्या कार्यक्रमात का सहभागी झाले? एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी भाषणही केले, असे त्यांनी म्हटले. सामान्य नागरिकांना असा संदेश गेल्यास खरातसारख्या व्यक्तींवर विश्वास निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी नमूद केले. दमानिया यांनी पुढे आणखी गंभीर आरोप करत म्हटले की, दत्ता कराळे यांच्या कॉल रेकॉर्डमध्ये देखील संशयास्पद बाबी असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या मते, अशोक खरात यांच्याशी संबंधित 18 कॉल्सचा उल्लेख आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी डिपार्टमेंटल व्हिजिलन्स मार्फत व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, या प्रकरणात पोलीस महासंचालकांनी स्वतः लक्ष घालून उत्तरदायित्व निश्चित करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यापूर्वीच या प्रकरणात अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या बहिणीचीही चौकशी झाली होती. त्यामुळे या प्रकरणाचा आवाका केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून विविध स्तरांवर त्याचे धागेदोरे पसरले असल्याचे स्पष्ट होत आहे. खात्यातील अडीच कोटी रुपये गोठवण्यात आले अंमलबजावणी संचालनालयानेही या प्रकरणात मोठी कारवाई करत नाशिक, पुणे आणि शिर्डी परिसरात एकाचवेळी छापेमारी केली. या कारवाईत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे पुरावे हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका ठिकाणावरून मोठी रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, खरात यांच्या बँक खात्यातील सुमारे अडीच कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत. याशिवाय एक आलिशान कारही जप्त करण्यात आली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर