ब्रेकिंग न्यूज
Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार
SP News Maregaon

मार्डी–बामर्डा जंगलात फिल्मी स्टाईल दरोड्याचा प्रयत्न फसला; ३ लाखांची रक्कम सुखरूप

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव : मार्डी–बामर्डा जंगल परिसरात धावत्या दुचाकीस्वाराला लाथ मारून खाली पाडत लूटमार करण्याचा थरारक प्रयत्न सोमवारी रात्री घडला. मात्र नशिबाच्या जोरावर हा मोठा अनर्थ टळला असून, तब्बल ३ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग दरोडेखोरांच्या हाती न लागता सुरक्षित सापडल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

चोपण येथील रहिवासी चेतन विजय चिंचोळकर (वय २५) हे सोमवारी रात्री सुमारे ८.५० वाजता वणीहून आपल्या गावाकडे दुचाकीने परतत होते. त्यांच्या जवळ शेती खरेदीसाठी आणलेली ३ लाख रुपयांची रोकड बॅगेत होती. मार्डी ते बामर्डा दरम्यानच्या जंगल पट्ट्यात दबा धरून बसलेल्या तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांचा पाठलाग केला.

दरम्यान, दरोडेखोरांनी चालत्या दुचाकीला जोरात लाथ मारल्याने चेतन रस्त्यावर कोसळले. त्याच वेळी त्यांच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली पैशांची बॅग उडून रस्त्याच्या कडेला झाडपाल्याच्या कचऱ्यात जाऊन पडली. खाली पडलेल्या चेतनची आणि त्यांच्या दुचाकीची दरोडेखोरांनी झडती घेतली, मात्र त्यांना काहीही हाती लागले नाही.

याचवेळी समोरून इतर वाहने येत असल्याचे पाहून पकडले जाण्याच्या भीतीने तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
प्रारंभी बॅग चोरीला गेल्याचा समज झाल्याने चेतन यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. मंगळवारी सकाळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, रस्त्याच्या कडेला झाडीत ती बॅग सुरक्षित आढळून आली. बॅगेतील संपूर्ण ३ लाख रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे अबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेमुळे वणी–नांदेपेरा–वडकी मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मारेगाव पोलीसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरू केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर