ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुक्यातील सोनू पोड (सराटी) येथील घटना

आत्महत्येचे नेमके कारण गुलदस्त्यात

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव :- तालुक्यातील मुक्ता (दांडगाव) येथील युवकाने सोनू पोड (सराटी) येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, दि. 13 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव नितेश कवडू आत्राम (वय 26) रा. मुक्ता (दांडगाव), ता. मारेगाव असे आहे. नितेश हा आठ दिवसांपूर्वी मुक्ता येथून आपल्या मामाच्या घरी मुक्कामी राहण्यासाठी सोनू पोड (सराटी) येथे आला होता.

A young man commits suicide by hanging himself.The incident took place in Sonu Pod (Sarati) in Maregaon taluka.
The exact reason for the suicide remains unknown.

मंगळवारी सकाळी नितेशने मामाच्याच्या घरातील काही व्यक्तींना शौचालयासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. मात्र बराच वेळ लोटूनही तो परत न आल्याने नातेवाइकांनी त्याचा शोध सुरू केला. शोधादरम्यान सोनू (पोड)जवळील जंगलात नितेशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती तात्काळ पोलीस पाटील यांना देण्यात आली. पोलीस पाटील यांनी मारेगाव पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठविण्यात आला आहे.

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.नितेशच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ व दोन बहिणी असा आप्त परिवार असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर