ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा विजय

270 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आ.संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा पराभव

प्रमोद रा. मेश्राम मारेगाव

25 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपवित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देरकर यांनी अखेर वणी विधानसभा मतदारसंघात विजयश्री खेचून आणली.त्यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचा 15560 मतांनी पराभव केला.

वणी विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारची चुरस पाहायला मिळालेली होती. सुरुवातीला तिकीट कोणत्या पक्षाला जाईल, त्यानंतर उमेदवार कोण असेल? यावरून रंगलेली ही लढत अखेर शिवसेनेच्या उबाठा गटाचे संजय देरकर यांना तिकीट जाहीर झाली.त्यावरून मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य रंगले. तिकिटाच्या रेसमध्ये असलेले संजय खाडे यांना तिकीट न मिळाल्यामुळे बंडोखोरी केली.तर शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांनीही संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला.

संजय देरकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे रंगतदार लढत होईल अशी शक्यता वाटत असतानाच शिवसेना आणि काँग्रेस मधील बंडखोरीमुळे ही लढत एकतर्फीच होते की काय?अशी शक्यता निर्माण झाली होती. अखेर 94618 मते घेत 79 058 मते घेणाऱ्या संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्यावर 15560 मतांनी विजय मिळविला.

मनसेनेही गाठला 20 हजाराचा पल्ला मनसेच्या राजू उंबरकर यांनीही 21 हजार 977 मते घेत मागील निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मते घेतली.तर काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष राहिलेल्या संजय खाडे यांना 7540 मते मिळाली.

संजय देरकर यांना पहिल्या फेरीत 1000 मतांची आघाडी मिळालेली होती. प्रत्येक फेरी गणिक ही आघाडी वाढत गेली.अखेर काही फेऱ्यांमध्ये ही आघाडी कमी झालेली होती.आता काय निकाल लागेल याची उत्सुकता वणी मतदार संघातील संपूर्ण जनतेला लागली होती. परंतु अखेर संजय देरकर यांनी ही आघाडी वाढवत 15,560 मतांनी विजयश्री खेचून आणत आमदार होण्याचा बहूमान मिळविला.



1999 मध्ये लढवली होती पहिली विधानसभेची निवडणूक नुकतेच निवडून आलेले शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांनी विधानसभेची पहिली निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 1999 ला लढवली होती. त्यानंतर 2009,2014 आणि 2019 ला त्यांनी ही निवडणूक लढवली. प्रत्येक वेळी त्यांना अपयश मिळाले. परंतु यावेळी त्यांनी विजयश्री खेचून आणण्यात यश मिळाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर