ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

सराटीत महिलांचा एल्गार

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अवैध दारूविक्रीविरोधात थेट कारवाई

प्रशासनाला ५ दिवसांचा अल्टिमेटम

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव तालुक्यातील सराटी गावात अवैध दारूविक्रीविरोधात महिलांनी आज जोरदार एल्गार पुकारत थेट कारवाईचा मार्ग अवलंबला. बुधवारी (दि. ९ एप्रिल) सकाळी साडेनऊच्या सुमारास महिलांनी एकत्र येत गावातील संशयित अवैध दारू विक्रेत्याच्या घरावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात ‘पोवे’ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अवैध धंद्याला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.गेल्या काही महिन्यांपासून सराटीत अवैध देशी दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत होता. विशेषतः महिला वर्गाने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याची गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दारूच्या अतिसेवनामुळे घरगुती वाद, महिलांवरील अत्याचार आणि सार्वजनिक शांततेचा भंग वाढल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दरम्यान, संबंधितांना वारंवार समज देऊनही अवैध व्यवसाय सुरूच ठेवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला असून काही ठिकाणी नागरिकांना धमकावल्याच्या घटनाही समोर आल्याचे निवेदनात नमूद आहे.

या पार्श्वभूमीवर सराटी येथील महिलांनी मारेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करत तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. अवैध दारूविक्रीवर तातडीने छापे टाकून हा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशी ठाम भूमिका महिलांनी घेतली आहे.

महिलांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, पाच दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास मारेगाव पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सदर निवेदनावर सुजाता वनकर, प्रियांका वानखेड, विजया सोयाम, प्रिती उपरे, मंदा सपाट, मनीषा पोटे यांच्यासह अनेक महिला व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून जोर धरत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर