ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

आता ‘ऑपरेशन तुडवा’ने उत्तर देणार:संजय राऊत कडाडले; फुटलेल्या खासदारांना आतापर्यंत 25 कोटी, राजस्थानला शिफ्ट केल्याचाही आरोप

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजप नेते गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. होय, आम्ही गद्दारांना शिव्या घातल्या, कारण त्यांनी गद्दारी केली आहे. पण तुम्हाला त्यांच्याविषयी एवढे प्रेम का ऊतू चालले आहे? असा सवाल करत राऊतांनी महायुतीच्या नेत्यांवर पलटवार केला. तसेच पक्ष सोडून गेलेल्या 6 खासदारांवर कोट्यवधी रुपयांच्या देवाणघेवाणीचा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप त्यांनी केला. 15 कोटी ॲडव्हान्स आणि काल पुन्हा 10 कोटी…
संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर पैशांचा पाऊस पाडण्यात आल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “पक्ष सोडून गेलेल्या त्या 6 खासदारांना आधी 15 कोटी रुपये ॲडव्हान्स दिले होते. काल पुन्हा त्यांना प्रत्येकी 10 कोटी रुपये देण्यात आले आहेत. म्हणजेच आतापर्यंत एका एका खासदाराला २५ कोटी रुपये मिळाले आहेत. काल रात्रीच त्यांना दिल्लीच्या ‘लीला’ हॉटेलमधून थेट राजस्थानला शिफ्ट करण्यात आले आहे, असेही राऊतांनी सांगितले. ‘ऑपरेशन टायगर’ला ‘ऑपरेशन तुडवा’ने उत्तर
ऑपरेशन टायगरवर बोलताना राऊत यांनी थेट चेतावणी दिली. “शिवसेना जर ऑपरेशन टायगर करत असेल, तर आम्ही आता त्यांच्या विरोधात ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करत आहोत. ‘तुडवा’ हा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा आम्हाला आदेश होता. गद्दारांना आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांना कसे तुडवायचे हे शिवसैनिकांना चांगले ठाऊक आहे. माझ्याकडे फक्त अर्धा तास द्या…” असे म्हणत संजय राऊत यांनी महायुतीला थेट आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर राजीनामे देऊन पुन्हा निवडून या!
दानवेंच्या अंतर्गत वादाच्या विधानाचा समाचार घेताना राऊत कडाडले, हे सर्वजण मशाल चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या नावावर निवडून आले आहेत. यांच्यात हिंमत असेल तर आधी खासदारकीचे राजीनामे द्यावेत आणि पुन्हा जनतेतून निवडून येऊन दाखवावे, मग आम्ही मानू की तुम्ही गद्दार नाही. गद्दारांना पोलिसांची फौज कशासाठी दिली आहे? आम्हाला खाकी वर्दीची मस्ती दाखवू नका. संजय राऊतांच्या शिवीगाळीनेच उबाठावर ही वेळ- रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे म्हणाले, ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले, त्यामध्ये भाजपचा कुठलाही हस्तक्षेप नाही. त्यांच्या अंतर्गत वादातून खासदार पक्ष सोडत आहेत आणि त्यासाठी भाजपला जबाबदार धरले जात आहे. हा त्यांचा कमकुवतपणा आहे. संजय राऊतांवर निशाणा साधताना ते म्हणाले, राऊतांची भाषा अधिक संयमी आणि सुसंस्कृत असती तर आज उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती. सततची शिवीगाळ आणि आक्रमक वक्तव्यांमुळेच पक्षातील नाराजी वाढली आहे. ठाकरे गटाची गैरहजर 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस:सावंत म्हणाले- त्यांना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा वेळ दिल्लीत शिवसेना (यूबीटी) संसदीय पक्षाची बैठक सुरू झाली. केवळ तीन लोकसभा खासदार, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाझे, उपस्थित झाले. पक्षाने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना गुरुवारी सकाळी ११ वाजता दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश देणारा व्हीप जारी केला होता. बैठकीपूर्वी पत्रकार परिषदेत यूबीटीचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, आमच्या खासदारांचे अपहरण झाले आहे. जे बैठकीला येतात ते आमच्यासोबत आहेत, जे येत नाहीत ते गद्दार आहेत. दरम्यान, शिवसेनेचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी गुरुवारी दावा केला की, यूबीटीचे सहा खासदार शिवसेनेत सामील झाले आहेत. ते म्हणाले की, ‘ऑपरेशन टायगर’ पूर्ण झाले आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर