ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मस्साजोगमध्ये सरपंचपदासाठी चुरस:संतोष देशमुख यांच्याकडून पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख मैदानात, अश्विनी देशमुखही सज्ज

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत मोठा राजकीय कलाटणी देणारा ट्विस्ट समोर आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी गावात प्रयत्न सुरू असतानाच, दिवंगत संतोष देशमुख यांच्याकडून पूर्वी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी अचानक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी आपण सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आज दुपारी एक ते तीन या वेळेत ते आपला अर्ज सादर करणार आहेत. गावातील लोकांनी बिनविरोध निवडणुकीची इच्छा व्यक्त केली तर आम्ही त्याचा आदर करू, पण अंतिम निर्णय मतदारच घेतील, असे त्यांनी सांगितले. गावात एकूण 2,284 मतदार असून, 29 तारखेला सगळं स्पष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनाही उमेदवारी देण्याचा निर्णय देशमुख कुटुंबीयांनी घेतला आहे. त्या आज सकाळी साध्या पद्धतीने अर्ज दाखल करणार आहेत. कुटुंबीयांशी चर्चा आणि ग्रामस्थांचा सल्ला घेऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. अश्विनी देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना, ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, असे मत व्यक्त केले. अण्णांचे अपूर्ण स्वप्न आम्ही पूर्ण करू. गावात पाणीटंचाई होऊ नये आणि विकासाची कामे थांबू नयेत, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे त्या म्हणाल्या. तसेच लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या उमेदवारीवर संयमित प्रतिक्रिया दिली. या घडामोडींवर धनंजय देशमुख यांनीही आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, आजचा अर्ज साध्या पद्धतीने दाखल केला जाणार आहे. संतोष देशमुख यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ज्यांनी आपला माणूस गमावला आहे, त्यांनाच त्या दुःखाची जाणीव असते. गावाने आमच्या वहिनींच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. नव्या सरपंचाचा कार्यकाळ सुमारे 18 महिन्यांचा दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या पदासाठी निवडून येणाऱ्या नव्या सरपंचाचा कार्यकाळ सुमारे 18 महिन्यांचा असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ गावाचाच नव्हे, तर जिल्ह्याचाही लक्ष लागले आहे. आता बिनविरोधीचा मार्ग मोकळा होतो की थेट लढत रंगते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर