ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मराठी साहित्य संमेलनाल गालबोट:संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला फासले काळे; आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


साताऱ्यात आयोजित अखिल भारतीय मराठी संमेलनात आज एक खळबळजनक घटना घडली. या संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला आज एका व्यक्तीने काळे फासले. हा व्यक्ती रिपाइंचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला जात आहे. त्याने विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे का फासले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण यामुळे साहित्य वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. साताऱ्यातील मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवारी सकाळी साहित्यिक डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी संमेलनात वेगवेगळे कार्यक्रम सुरू असताना संदीप जाधव नामक एका व्यक्तीने संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला केला. त्याने विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वचजण स्तब्ध झाले. स्वतः कुलकर्णी यांनाही काहीक्षण काय झाले हे समजले नाही. संदीप जाधव यांनी हा हल्ला का केला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण ते रिपाइंचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात गळ्यात निळा रुमाल असलेले संदीप जाधव ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणा देत विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासताना दिसत आहेत. काळे फासल्यानंतर हल्लेखोर व्यक्ती राष्ट्रगीत म्हणतानाही व्हिडिओत दिसत आहे. ही घटना व्यासपीठावर जाणाऱ्या पायऱ्यांजवळ घडली. त्यानंतर आयोजकांनी विनोद कुलकर्णी यांना सावरत दुसऱ्या बाजूला नेले. शाहूपुरी पोलिसांनी आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतले आहे. त्यांनी गनिमी कावा करून हे आंदोलन केले. केमिकलमुळे विनोद कुलकर्णी यांना श्वास घेण्याचा त्रास होत आहे. खाली पाहा घटनेचा व्हिडिओ

संभाजी ब्रिगेडने संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांना दिला होता इशारा दुसरीकडे, संभाजी ब्रिगेडने साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना त्यांच्या संभाजी या कादंबरीमधील छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या लिखाणाविषयी निर्वाणीचा इशारा दिला होता. विश्वास पाटील यांनी ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करून संभाजी महाराजांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे. त्यामुळे त्यानी तत्काळ जाहीर माफी मागावी. अन्यथा साहित्य संमेलन उधळवून लावले जाईल, असे संभाजी ब्रिगेडने म्हटले होते. विश्वास पाटील जेम्स लेनचे मावस भाऊ आहेत का? असा सवालही या संघटनेने या प्रकरणी केला होता. हे ही वाचा… बिघडलेले गाव सुधारण्यासाठी पाटील अन् कुलकर्ण्यांना युती करावीच लागते:अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांचे विधान
बिघडलेले गाव सुधारण्यासाठी पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते, असे विधान ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पानिपतकार विश्वास पाटील यांनी केले. संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून सामाजिक, राजकीय तसेच साहित्यिक वर्तुळात नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात फक्त मराठी भाषेचीच सक्ती राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर