ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

यश डोक्यात न ठेवता पुढचा यशाचा मार्ग चालायला लागा:अभिनेते भारत गणेशपुरेंचा कानमंत्र, लोकरंगच्या नाट्य प्रशिक्षणाची सांगता‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कितीही मोठं यश मिळालं तरी ते डोक्यात न ठेवता, त्याचाच आनंद साजरा करत न बसता नवीन काही योजना करण्यासाठी कामाला लागलं पाहिजे, असा कानमंत्र सुप्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी दिला. “लोकरंग’तर्फे आयोजित तीन दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर ‘लोकरंग’चे अध्यक्ष अनिल गावंडे, प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक ढेरे, अ‍ॅड. सुधाकर खुमकर, प्रभात किड्सच्या संचालिका वंदना नारे, प्राचार्य प्रदीपसिंह राजपूत, प्रा. डॉ. ममता इंगोले, नीरज आवंडेकर, डॉ. संदीप चव्हाण, श्रीकांत पागृत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अ‍ॅड. सुधाकर खुमकर यांनी प्रास्ताविकातून ‘लोकरंग’ संस्थेची सांस्कृतिक, कलाविषयक भूमिका स्पष्ट केली. तसेच ‘लोकरंग’तर्फे राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देत भविष्यातील सांस्कृतिक योजनांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांनी केले. मान्यवर, पालक व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे आभारही त्यांनी मानले. समारोप समारंभाला पालक व नागरिक उपस्थित होते. यशासाठी ऊर्जा, सातत्य गरजेचे : अभिनेते अंकुर वाढवे म्हणाले की, कलाक्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर ऊर्जा, सातत्य व सकारात्मकता कायम ठेवावी लागते. ‘लोकरंग’चे अध्यक्ष अनिल गावंडे यांनी विद्यार्थी व पालकांना अशा सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा मिळण्यासाठी ‘लोकरंग’ भविष्यातही विविध सांस्कृतिक उपक्रम राबवत राहील,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर