ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा:जमिनीवरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील वीर जवान आणि अधिकारी शहीद झाल्यानंतर त्यांच्या वीर माता, वीर पत्नी किंवा अधिकृत वारसांना उदरनिर्वाहासाठी शासनाकडून शेतीसाठी जमीन दिली जाते. मात्र, ही जमीन त्यांच्या नावावर करताना मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना दिली. माध्यमांशी बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शहीद कुटुंबांना दिलासा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतला असून, आता महसूल खात्याची जमीन वीर माता किंवा पत्नीच्या नावे करताना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.” माथेरानला 5 एकर पार्किंग आणि क्रीडा संकुलाला निधी मंत्रिमंडळ बैठकीतील इतर निर्णयांची माहिती देताना बावनकुळे यांनी सांगितले की, प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरान येथे पर्यटकांसाठी पार्किंगची मोठी समस्या होती. यासाठी माथेरान नगरपालिकेच्या मागणीनुसार महसूल विभागाची 5 एकर जागा पार्किंगसाठी मंजूर करण्यात आली आहे. याशिवाय, नागपूर जिल्ह्यातील ‘गादा’ येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ठाणे जमीन गैरव्यवहार माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नावाशी जोडल्या गेलेल्या आदिवासी जमीन प्रकरणावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जिल्हाधिकाऱ्यांकडून 3 प्राथमिक अहवाल प्राप्त झाले आहेत. यात नियमांनुसार झालेली प्रक्रिया, सुनावणीची संधी आणि तांत्रिक त्रुटी तपासल्या जात असून सरकार यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ‘ऑपरेशन टायगर’शी भाजपचा संबंध नाही शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींवरून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, ‘ऑपरेशन टायगर’शी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. आपला पक्ष कसा चालवायचा किंवा वाढवायचा हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा अंतर्गत प्रश्न आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर