ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपला:शरद पवारांनी दिल्लीत असणे गरजेचे, अजित पवारांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी करा- जयंत पाटील

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल ठाकरेंशी काहीही चर्चा झाली नाही. पण आता हा विलीनीकरणाचा विषयच नाही, कारण ज्यांच्याशी चर्चा केली ते आज दुर्दैवाने आपल्यात नाहीत त्यामुळे आता तो प्रश्नच नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे गटाकडून आमच्या कुठल्या नावाला विरोध झाला असे काही नाही. प्रत्येक पक्षाला आपल्या विद्यमान उमेदवारासाठी जागा मिळावी असे वाटत असते. जयंत पाटील म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्या निधनामुळे पूर्णपणे थांबलेली आहे. आता ही चर्चा पुढे जाणे शक्य नाही आणि आम्ही कुणासोबत चर्चाही करत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना काय आहे हे समजून घेणाराच आता नसल्याने विलीनीकरणाची पूर्णपणे थांबली असून यापुढे ही शक्यता नाही. विलीनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्या आग्रहाने सुरू झाली होती ती पूर्ण होऊ शकली नाही. आता हा प्रश्न बाजूला गेलेला आहे. आमच्यावर दोन्हीही पक्षाला शंका असण्याचे कारण नाही. आम्ही ठाकरेंना आमची इच्छा सांगितली जयंत पाटील म्हणाले की, काल मी आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शरद पवार यांनी दिल्लीत असणे गरजेचे आहे, त्यासाठी त्यांची राज्यसभेसाठी निवड करण्यात यावी अशी आमची इच्छा आहे ती उद्धव ठाकरेंच्या कानावर घातली. आमच्या पक्षाने आणि काँग्रेसने एकत्र बसत काल किंवा आज निर्णय घेऊ असा उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितले. मिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करणार आहोत. राज्यसभेसंदर्भात निर्णय झालेला नाही जयंत पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे यांचे बरोबर आहे अजून राज्यसभेसंदर्भात काहीही निर्णय झालेला नाही. निर्णय झाला असे आम्हीही सांगितले नाही. मविआतील सर्व पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. मविआ आणि राष्ट्रवादीसाठी शरद पवार दिल्लीत असणे गरजेचे आहे. शरद पवारांनी राज्यसभेवर जावे यासाठी आम्ही आज सुद्धा चर्चा करणार आहोत. आता फक्त राज्यसभेची चर्चा सुरू आहे. मविआ एकत्रित असेल तर विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत काहीही अडचण येणार नाही. पायलटचे कॉल रेकॉर्ड तपासावे जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघाताबद्दल सरकारने पारदर्शक चौकशी केली पाहिजे. तांत्रिक चौकशीमध्ये सर्व काही समोर आले पाहिजे. पायलट बदलला का? त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासणे, जो पायलट आला त्यांच्याशी कोणाचे बोलणं झाले या सर्व गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे. सरकारने जनतेच्या मनातील शंका दूर केली पाहिजे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर