ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

मुंबईत गेटवे ऑफ इंडियावर ‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’चे जलसमाधी आंदोलन:आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, शासनाचा अध्यादेश समुद्रात फेकला!

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट आणि विनाअट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात आज प्रचंड थरार पाहायला मिळाला. बुलढाणा येथे मागील चार दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’च्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत समुद्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांनी शासनाचा कर्जमुक्तीचा अध्यादेश समुद्रात फेकून देत तीव्र संताप व्यक्त केला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना ताब्यात घेतले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाणा येथे शेतकऱ्यांच्या सरसकट व विनाअट कर्जमुक्तीसाठी गेल्या 4 दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहेत. आंदोलनाचा आज चौथा दिवस असतानाही राज्य सरकारकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. राज्यभरातून आंदोलनाला पाठिंबा दरम्यान, तुपकर यांच्या आंदोलनास पाठिंबा तसेच सरसगट कर्जमाफीच्या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गनिमी काव्याने आक्रमक आंदोलन छेडले आहे. संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, राजीव कसबे, लक्ष्मण मोरे, सचिन पांडुळे, सांगली संपर्क प्रमुख अजितराव गडदे, सतीश इढोळे, राहुल वानखेडे, कळमनुरी तालुकाध्यक्ष चैतन्य चव्हाण आणि रमेश जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत गेट वे ऑफ इंडिया जवळ जाऊन आंदोलन सुरु केले. यावेळी शासनाने जाहीर केलेल्या फसव्या कर्जमुक्तीच्या अध्यादेश समुद्रात फेकून दिला त्यानंतर कार्यकर्ते जलसमाधी आंदोलनाच्या पवित्र्यात असतांना कुलाबा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. यावेळी “शेतकऱ्यांना न्याय द्या”, “फसवी कर्जमाफी रद्द करा”, “सरसकट कर्जमुक्ती लागू करा” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनाची तीव्रता वाढताच पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार झटापट झाली. आंदोलनकर्त्यांना अक्षरशः ओढत-फरफटत पोलिस वाहनात टाकण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कुलाबा पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर