ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

महाराष्ट्रात कुणाला घाबरायचे नाही का?:कामचुकार कर्मचाऱ्यांसाठी ‘ठोको विधेयक’ आणावे लागेल, सुधीर मुनगंटीवार विधानसभेत संतापले

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेतील कामकाजात होणाऱ्या दिरंगाईच्या मुद्यावर कामचुकार अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. या प्रकरणी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दर्शवली. तसेच विधान मंडळाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत विधीमंडळाचे कामकाजाचे लवकरच डिजिटलायझेशन होणार असल्याचे स्पष्ट केले. सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेत बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष कामकाजाचा दर्जा सुधारण्यासाठी व गुणात्मक बदल करण्यासाठी विविध दिशानिर्देश देत असतात. पुरवणी मागण्या मांडल्यानंतर कपात सूचनेचे उत्तर 30 दिवसांत मिळणे हा सदस्याचा अधिकार आहे. पण मागच्याही अधिवेशनात लक्षवेधीची उत्तरे मिळाली नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी सुमोटो घेत मुख्य सचिवांवर हक्कभंग आणण्याची घोषणा केली होती. मी 16 मार्च 2022 रोजी कपात सूचना मांडली होती. त्याचे उत्तर मला गत 18 फेब्रुवारी रोजी मिळाले. या काळात एक विधानसभा बदलली. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात विधानसभेत होणाऱ्या कामकाजाविषयी गांभीर्य नसेल, उदासीनता असेल व कामकाजाविषयी त्यांच्या मनात कुठली भीती नसेल तर या कामकाजाचा गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी तुम्ही जे काही करत आहात, त्याला काहीही उपयोग नाही, असे सुधीर मुनगंटीवार विधानसभा अध्यक्षांना उद्देशून म्हणाले. कामचुकार कर्मचाऱ्यांसाठी ठोको विधेयक आणा ते पुढे म्हणाले, ही चिऊ ताई, चिऊ ताई दार उघड, कापूस कोंड्यासारखी व अकबर बिरबलाच्या खिचडीसारखी कथा आहे. आपण दुसरे तरुण अध्यक्ष आहात. तुमच्या कार्यकाळात गुणात्मक दर्जात बदल करायचा असेल, तर तुम्हाला समोरील चांदीच्या दंडाचा वापर करावाच लागेल. 4 वर्षांनी कपात सूचनेचे उत्तर मिळत आहे. महाराष्ट्रात कुणाला घाबरायचे नाही का? अजूनही लक्षवेधीची उत्तरे मिळाली नाहीत. मग आपल्याला कमीत कमी अशा कामचुकार कर्मचाऱ्यांसाठी ठोको विधेयक 2026 पास करावे लागेल. कपात सूचनेच्या उत्तरावषयी आपण चौकशी करून 2 दिवसांत अहवाल मागवा व संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांनी केले मागणीचे समर्थन सुधीर मुनगंटीवार यांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले, मी सुधीर मुनगंटीवार यांच्या मताशी सहमत आहे. ते नशिबवान आहेत की, त्यांना 4 वर्षांत उत्तर मिळाले. मी आमदार असताना एक सूचना मांडली होती. त्याचे उत्तर मी उपमुख्यमंत्री झालो तेव्हा मिळाले होते. त्यामुळे यात काहीतरी ऑडिट सिस्टम केली पाहिजे. जी वेगवेगळी आयुधे, आश्वासने आहेत त्याची कोणकोणत्या विभागांकडे प्रलंबित आहेत याची वेळोवेळी माहिती गेणे, त्या-त्या मंत्र्यांकडे माहिती जाणे हे या प्रकरणी करण्याची गरज आहे. अधिवेशन सुरू नसताना विधान मंडळाचे हेच काम आहे. अधिवेशनाशिवाय विधान मंडळाकडे कोणतेही काम नाही. त्यामुळे या गोष्टीचा गांभिर्याने विचार करून या सर्व गोष्टी ट्रॅकिंग करण्याचा आपण विचार करावा, अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर