ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

पिंपरी बुद्रक वाळू घाटावर उत्खनन:कंत्राटदाराला ८५ लाखांच्या दंडाची नोटीस, ४८ तासांत खुलासा करण्याचे आदेश

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक येथील वाळूघाटावरील गौण खनिज उत्खनन प्रकरणात कंत्राटदारास तब्बल ८५ लाख रुपये दंडाची नोटीस उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी दिली आहे. या प्रकरणी ४८ तासात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक शिवारातील वाळूघाटाचा लिलाव झाला होता. सदर लिलावातून वाळू घाट सिध्दांत बिल्डींग मटेरीयलचेे सिध्दांत नरवाडे कुपटी यांनी घेतला आहे. या वाळू घाटाच्या लिलावामध्येच सर्व अटी व शर्ती नमुद करण्यात आल्या होत्या. त्यानुसार वाळू घाटातून नियमानुसार ८९० ब्रास वाळू उपसा करणे अपेक्षीत होते. त्यानुसार या ठिकाणी वाळू उपसा करून वाहतूक केली जात होती. मात्र वाळू घाटावर चार बोटीद्वारे वाळू उपसा करून चार जेसीबीद्वारे वाळू व मुरुम भरून ११ हायवा द्वारे वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना यांच्या पथकाने ता. २७ मार्च रोजी रात्री छापा टाकला असता त्या ठिकाणी काही हायवामध्ये मुरुम तर काही हायवामध्ये वाळू आढळून आली. तसेच घाटावरील जेसीबीद्वारे रस्ता तयार करण्याचे काम केले जात असल्याचे पथकाला दिसून आले. त्यावरून सहाय्यक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना यांच्या पथकाने चार बोटी जाळून नष्ट केल्या तर ११ हायवा व चार जेसीबी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात जमा केल्या आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर केला. त्यामध्ये ८९० ब्रास वाळू उपसा करणे अपेक्षीत असतांना प्रत्यक्षात १००० ब्रास वाळू उपसा केल्याचे अहवालात नमुद केले या शिवाय लिलावातील अटी व शर्तीचा भंग केल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावरून उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी सिध्दांत बिल्डींग मटेरीयलचे सिध्दांत नरवाडे यांना नोटीस दिली असून यामध्ये एकूण दंडात्मक रक्कम ८५.७० लाख रुपये का आकारले जाऊ नये तसेच पुढील काळात अनाधिकृतरित्या गौणखणीज उत्खनन व वाहतूक करणार नाही याचे बंध प्रमाणपत्र का घेण्यात येेऊ नये याचा खुलासा ४८ तासात सादर करावा अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपविभागीय अधिकारी भुते यांनी दिला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर