ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे बुलढण्यात जाहीर वाचन:संजय गायकवाड काय करतात बघू, अ‍ॅड. असीम सरोदे यांचे थेट आव्हान

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून नवा वाद उफाळून आला असून बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हे शीर्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारे असल्याचा दावा करत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार समोर आली आहे. या कथित संवादाची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत झाली आहे. यावरून विरोधकांनी गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता अ‍ॅड. असीम सरोदे यांनी थेट आव्हान दिले आहे. बुलढाण्यात लवकरच ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे जाहीर वचन करण्यात येणार. संजय गायकवाड काय करतो बघू, अशा शब्दात असीम सरोदे यांनी थेट आव्हान दिले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, आमदार संजय गायकवाड यांची भाषा बघा. 1988 मध्ये प्रकाशित शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे सर यांच्या पुस्तकाच्या शीर्षकात ‘शिवाजी कोण होता’ असा एकेरी उल्लेख का? असा संजय गायकवाडचा आक्षेप आहे व त्यासाठी त्याने पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून अत्यंत अश्लील, अर्वाच्य शिव्या दिल्या. त्याच भरात संजय गायकवाड असे म्हणाला की, शिवाजी महाराज तुया मायचा नवरा होता असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान केला. पुढे असीम सरोदे म्हणाले, सॅल्यूट केला पाहिजे प्रशांत आंबी या प्रकाशकाला की भाषेचा स्तर, आवाजातील स्वर ढळू न देता अत्यंत संयमित पद्धतीने त्याने गुंड प्रवृत्तीच्या आमदार संजय गायकवाड याच्या सोबत संवाद केला. आत्ताच माझे प्रशांत सोबत बोलणे झाले. संजय गायकवाड विरोधात लवकरच पोलिसांकडे तक्रार दाखल करणार. संजय गायकवाड आमदार आहे म्हणजे शिवीगाळ करण्याचे, कुणालाही मारहाण करण्याचे लायसन्स त्याला मिळालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या आई प्रमाण हृदयातील स्थान देऊन ‘शिवाजी’ म्हणणं म्हणजे महाराजांचा अपमान नाही. बरं संजय गायकवाड सारखे अशिक्षित, अडाणी प्रवृत्तीचे लोक पूर्ण पुस्तक वाचत सुद्धा नाहीत व इतरांना शिवीगाळ सुरु करतात. आता अश्या मूर्खतेला कायद्याच्या मदतीने नेहमीसाठी लगाम लावावा लागेल, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर