ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मराठी कलाकारांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत घेतले मनसेचे सभासदत्व:शिवतीर्थावर गर्दी; पक्षाच्या सदस्य नोंदणीला वेग

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला वेग आला असून आता मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक मराठी कलाकारांनी पक्षाचे सभासदत्व स्वीकारले. दादरमधील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात ही सदस्य नोंदणी पार पडली. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या या अभियानाला कलाकारांचा प्रतिसाद मिळाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा 9 मार्च रोजी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राज्यभर मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी मोहीम राबवण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी अधिक सक्रिय व्हावे, असेही त्यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी सदस्य नोंदणीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अभिनेते पुष्कर श्रोत्री, भरत जाधव, दिग्दर्शक केदार शिंदे तसेच अॅडव्होकेट गुरु भरत दाभोलकर यांनी उपस्थित राहून मनसेच्या सदस्य नोंदणी प्रक्रियेत सहभाग घेतला. मराठी कलाक्षेत्रातील या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंग चढला. कलाकारांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षाच्या उपक्रमांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. मोहिमेला आणखी गती मिळण्याची शक्यता या कार्यक्रमाला मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि पक्षाच्या नेत्या शालिनी ठाकरे देखील उपस्थित होत्या. मनसेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर सदस्य नोंदणी अभियान राबवले जात असून विविध क्षेत्रातील व्यक्तींना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून आता मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाचे सभासदत्व स्वीकारले आहे. त्यामुळे आगामी काळात या मोहिमेला आणखी गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर