ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मोहोळ शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी बायपासची गरज:234 किमी लांबीच्या महामार्गाला सर्व्हिस रोड जोडल्याने अपघातांत वाढ‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) हा आळंदी ते पंढरपूरसह मोहोळ ते वाखरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो सुमारे २३४ किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. पुणे, सातारासह सोलापूर जिल्ह्याला जोडणारा हा मार्ग आहे. या मार्गास ७,६२५ कोटी रुपयांच्या तरतुदीसह विकसित करण्यात येणार असल्याची माहिती रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. मात्र मोहोळ शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी बायपास केल्यास वाहतूक कोंडीसह विकासाला चालना देणारा निर्णय होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) हा आळंदी ते पंढरपूरसह मोहोळ ते वाखरी या मार्गाचे बांधकाम मोहोळ ते वाखरी, वाखरी ते खुडूस, खुडूस ते धर्मपूरी, धर्मपूरी ते लोणंद, लोणंद ते दिवे घाट, दिवे घाट ते हडपसर जोडला जाणार असल्याची माहिती रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. सध्या मोहोळ पंढरपूर पालखी महामार्ग हा सर्व्हिस रोडलाच जोडल्यामुळे मोहोळ शहरासह तालुक्यातील विद्यार्थ्यासह नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना दररोज करावा लागत आहे. त्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागला आहे, तर काहींना कायमस्वरूपी अभंगतत्त्वासह किरकोळ दुखापतींचा सामना करावा लागत आहे. त्यातच नव्याने होणाऱ्या मार्गामुळे अधिकच मोहोळ शहरात वाहतूक कोंडीसह अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे सदर जोडल्या जाणाऱ्या मार्गाबरोबरच मोहोळ शहराला बायपास अत्यंत आवश्यक असून केल्यास उद्योग धंद्याबरोबरच वाहतूक कोंडीला दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर अपघातांचे प्रमाण कमीसह प्रवास सुखकर होण्यास मदत होईल. ^सध्या तापमान मध्ये बहुतांश वाढ होत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) हा आळंदी ते पंढरपूरसह मोहोळ ते वाखरी या मार्गाचे बांधकाम होणार आहे. सदर मार्ग होत असताना झाडे लावून जतन करण्यात यावीत. मोहोळ-पंढरपूर पालखी महामार्गासह राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. मात्र सदर रस्त्याच्या बाजूस वृक्ष लागवड केली आहे, परंतु जोपासण्यास प्रशासनास अपयश आले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूस असणारी झाडे हे पूर्वी लागवड केलेली आहे. संग्राम भोसले, नागरिक ^मोहोळ पंढरपूर या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी स्वतंत्र पदयात्रा मार्ग उभारण्यात आला आहे. यामुळे वारकऱ्यांची वारी आता अधिक सुरक्षिततेसह सुव्यवस्थित झाली आहे. मात्र सदर पालखी महामार्ग हा सर्व्हिस रोडलाच जोडल्यामुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यावली, हॉटेल रॉयल किंग मोहोळ, नजीक पिंपरी मार्गे बायपास केल्यास वाहतूक कोंडीसह अपघाताच्या प्रमाणात घट होण्यास मदत होईल. किसन लेंगरे, नागरिक ^मोहोळ शहरातील सर्व्हिस रोडवर बहुतांश वेळा वाहतूक कोंडी होत आहे. ब्रिजवर जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते. मात्र करण्यात आले नाही. सदर ठिकाणावरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी बायपास केल्यास वाहतूक कोंडी रोखण्यास मदत होईल. बाळासाहेब भरणे, पोलिस निरीक्षक, जिल्हा ट्राफिक पिंपरी मार्गे बायपास केल्यास अपघातांचे प्रमाण घटेल वाहतूक कोंडी रोखण्यास मदत

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर