ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मुंबईत मरीन ड्राईव्हवर भयंकर अपघात:भरधाव दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांसह 3 जण ठार; सिग्नलकडे दुर्लक्ष करणे भोवले

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भरधाव वेगातील दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांसह एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना सोमवारी पहाटे मुंबईतील मरीन ड्राईव्हवर घडली. दुचाकी चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सोमवारी पहाटे 5.40 च्या सुमारास एन. एस. रोडवरील पारसी जिमखाना जंक्शन सिग्नलवर घडली. दुचाकीस्वार आपली दुचाकी भरधाव वेगात चालवत होता. त्याच्यासोबत एक महिलाही मागे बसली होती. दुचाकीस्वाराने सिग्नलकडे दुर्लक्ष केले आणि रस्त्याने चालणाऱ्या एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला व पुरुषासह पादचारी या तिघांचाही मृत्यू झाला. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे घडला हे ही यासंबंधी तपासले जात आहे. पण दुचाकी चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. नेमकी काय घडली घटना? मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर या भागातील अनेक नागरीक दररोज मॉर्निंग वॉकला येतात. त्यानुसार, एक वृद्ध व्यक्ती सोमवारी पहाटे याठिकाणी वॉकला आले होते. त्यावेळी एका दुचाकीस्वाराने (MH 01 EL 6366) त्यांना जोराची धडक दिली. त्यानंतर हीच दुचाकी पुढे जाऊन इतर दोन स्कुटींना धडकली. या तिहेरी अपघातात दुचाकीवरील दोघे व पादचारी वृद्ध असे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने लगतच्या जे टी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. एन एस रोडच्या उत्तर दिशेकडील मार्गावर पहाटे ही घटना घडली. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था काहीशी विस्कळीत झाली. पण पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून ती सुरूळीत केली. मृतांची ओळख अद्याप पटली नाही. पोलिसांचे वेग मर्यादा पाळण्याचे आवाहन मरीन ड्राईव्ह पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. यासंबंधी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अपघाताचा नेमका घटनाक्रम शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात रात्री आणि पहाटेच्या वेळी गाड्यांचा वेग प्रचंड असतो. ‘स्पीड थ्रिल’च्या नादात अनेक तरुण आपला जीव धोक्यात घालत असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना वेग मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. हे ही वाचा… बिर्याणी आणि कलिंगड खाणे बेतले जीवावर:विषबाधेमुळे अख्खे कुटुंब संपले, दोन चिमुरड्यांसह आई-वडिलांचा अंत; मुंबईतील घटना
मुंबईच्या गजबजलेल्या पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणानंतर झालेल्या भीषण विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये १३ आणि १६ वर्षांच्या दोन मुलींचा समावेश असून, या घटनेमुळे संपूर्ण दक्षिण मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर