ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

अब्दुल सत्तारांच्या मुलाचा जिल्हा बँकेसाठी अर्ज बाद!:यात काय राजकारण माहीत नाही, देवेंद्रजी योग्य न्याय करतील- सत्तार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरीची तलवार म्यान करणाऱ्या शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना आता आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत त्यांचे सुपुत्र समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज अत्यंत क्षुल्लक कारणावरून अवैध ठरवण्यात आला आहे. या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत, यामागे नेमके कोणते राजकारण दडले आहे हे सांगणे कठीण असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे. तसेच, या संदर्भात आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असून, देवेंद्र फडणवीस आपल्याला नक्कीच योग्य तो न्याय देतील, असा विश्वासही अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे. समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज अत्यंत क्षुल्लक कारणावरून अवैध ठरवण्यात आल्याचा दावा शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केला आहे. प्रशासनाने दिलेल्या कारणानुसार, ज्या जागेवरून व्यवस्थापन केले जाणार आहे ती जागा भाड्याने दिलेली असल्याचा ठपका ठेवून हा अर्ज बाद करण्यात आला आहे. मात्र, यावर आक्षेप घेत सत्तार यांनी स्पष्ट केले की, मुळात नियम 58 नुसार ते सदस्यच नसल्यामुळे ही अट त्यांना लागू होत नाही. त्यामुळे केवळ या तांत्रिक मुद्द्यावर उमेदवारी नाकारणे हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कारवाईमागे नेमके कोणते राजकारण दडले आहे हे आताच सांगता येणार नाही, अशी शंकाही अब्दुल सत्तार त्यांनी उपस्थित केली आहे. याप्रकरणी आपण लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः वकील असल्याने त्यांना कायद्याची आणि नियमांची सखोल माहिती आहे, त्यामुळे ते या प्रकरणात लक्ष घालून नक्कीच योग्य तो न्याय देतील, अशी अपेक्षा सत्तार यांनी व्यक्त केली आहे. संजना दानवेंचाही अर्ज बाद छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या व कन्नडच्या शिवसेना आमदार संजना जाधव यांचाही उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. अर्जांमध्ये केवळ किरकोळ चुका काढून हे अर्ज जाणीवपूर्वक अवैध ठरवण्यात आल्याचा गंभीर आरोप आता शिवसेनेकडून केला जात आहे. एकाच वेळी दोन मोठ्या नेत्यांच्या वारसदारांना असा धक्का बसल्यामुळे, या मुद्द्यावरून आता महायुतीत म्हणजेच भाजप आणि शिवसेनेत नव्या वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. 8 जुलै रोजी होणार मतदान जिल्हा सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम 1 जून रोजी जाहीर झाला असून, येत्या 8 जुलै रोजी यासाठी प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून संचालकपदासाठी एकूण 214 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते, ज्यामध्ये अनेक मंत्री, आमदार आणि खासदार यांच्या मुलांसह दिग्गज नेत्यांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होता. मात्र, अर्जांच्या छाननी प्रक्रियेदरम्यान या सर्व दिग्गजांपैकी समीर सत्तार आणि आमदार संजना जाधव या दोन महत्त्वाच्या उमेदवारांचेच अर्ज बाद झाल्याने या निवडणुकीत मोठी खळबळ उडाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर