ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

भाऊ अन् भाच्यांच्या त्रासाला बहीण कंटाळली!:हिंगोली तालुक्यात वृद्ध महिलेने शेतात संपवले जीवन, चाैंघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे जेसीबीच्या पैशाच्या कारणावरून सख्खा भाऊ व भाच्यांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून महिलेने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ता. 30 हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिग्रस कऱ्हाळे येथील जगन भिसे व त्याच्या मामाचा मुलगा वैजनाथ कऱ्हाळे या दोघांनी मिळून जेसीबी मशीन घेतली होती. सुमारे 28 लाख रुपयांच्या जेसीबी मशीनसाठी दोघांनी प्रत्येकी साडेचार लाख रुपयांचा भरणा केली होता. त्यानंतर जेसीबीने कामे करून हप्ते फेडले होते. जेसीबीमशीनचे हप्ते फिटल्यानंतर मशीन दोघांपैकी कोणीही अर्धे पैसे देऊन ठेऊन घेण्याचे ठरले होते. त्यानुसार जेसीबी मशीनचे हप्ते पूर्ण झाल्यानंतर जगन यांनी मशीनचे अर्धे पैसे देऊन मशीन ठेवायची असे सांगितले. त्यासाठी 12.50 लाख रुपये देखील वैजनाथ याला दिले होते. मात्र वैजनाथ याने मशीन दिली नाही. त्यावरून दोघांमध्ये वादाला तोंड फुटले. सदर वाद विकोपाला गेल्यानंतर गावातील काही मंडळींनी एकत्रीत बसून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्येही तोडगा निघाला नाही. या प्रकरणामुळे जगन यांची आई सुर्यकांताबाई भिसे (60) ह्या मानसिक त्रासातच होत्या. त्यातच वैजनाथ व इतरांनी त्यांना धमकी दिली. या त्रासाला कंटाळून सुर्यकांताबाई यांनी शुक्रवारी ता. 29 दुपारी चार वाजता शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जगन व त्यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, उपनिरीक्षक राहुल घुले यांच्यासह पोलिसांच्या पथकाने भेट दिली. या प्रकरण जगन भिसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी वैजनाथ कऱ्हाळे, प्रकाश कऱ्हाळे, गणेश कऱ्हाळे, ज्ञानबा नामदेव कऱ्हाळे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक राहुल घुले, जमादार आशिष उंबरकर, सुधीर ठेंबरे पुढील तपास करीत आहेत.
‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर