ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट:भीमा नदीकाठच्या गावांत वीजपुरवठा‎ खंडित; उभ्या पिकांची होतेय होरप‌‌ळ‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यंदा उन्हाचा तडाखा तीव्र असतानाच पंढरपूर तालुक्यातील महावितरणच्या अघोषित भारनियमनामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. तालुक्यातील इसाबावी, चिंचोली भोसे, आणि गुरसाळे या भागात भीमा नदीच्या किनाऱ्यावर पाणी उपलब्ध असूनही, वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे उभ्या पिकांची मोठी होरपळ सुरू आहे. ‘पाणी पायथ्याला आणि उन्हाचा आगडोंब माथ्याला’ अशी अत्यंत बिकट स्थिती सध्या या भागात निर्माण झाली आहे. नदीकाठच्या भागात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत पिकांना नियमित पाण्याची नितांत गरज असते. मात्र, महावितरणने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भारनियमन सुरू केले आहे. वारंवार वीज खंडित होणे किंवा कमी दाबाने वीज मिळणे यामुळे शेतकऱ्यांना नदीत पाणी असूनही ते पिकांपर्यंत पोहोचवता येत नाही. परिणामी, शेतकऱ्यांची हुकमी नगदी पिके असलेली ऊस आणि इतर पिके डोळ्यांदेखत वाळून चालली आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी लाखो रुपये खर्च करून उभी केलेली पिके ऐन उन्हाळ्यात करपून जात असल्याने शेतकरी कमालीचे अडचणीत आले आहेत. भीमा नदीच्या किनाऱ्यावर असूनही विजेअभावी शेतीचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. प्रतिनिधी | पांडे पिके जळू लागल्याने शेती पंपांना सुरळीत आणि उच्च दाबाने वीज मिळावी, म्हणून करमाळा तालुक्यातील शेतकरी भर उन्हातान्हात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहेत. कधी महावितरण कार्यालयावर धडक, कधी रास्ता रोको, तर कधी मशाल मोर्चा काढून शेतकऱ्यांनी आपला आवाज उठवला; मात्र लोकशाही मार्गाने घेतलेल्या या आक्षेपांना महावितरणने केराची टोपली दाखवली. आता करमाळ्यातील बळीराजाचा संयम सुटत चालला असून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दुसरीकडे सत्ताधारी नेतेमंडळी मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रणनीतीच मश्गुल दिसत आहेत. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे आणि योग्य नियोजनाच्या अभावामुळे अनेक भागांमध्ये शेती पंपांना कमी दाबाने वीज मिळत असून उभी पिके जळण्याच्या मार्गावर आली आहेत. त्यामुळे “आपली समस्या घेऊन नेमके कोणाकडे जायचे?” असा मोठा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. प्रतिनिधी | पंढरपूर पंढरपूर तालुक्यातील विजेचे भारनियमन आणि वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दि. २० जून रोजी आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आमदार पाटील यांनी आवाहन केले . सध्या शेतात उभी असलेली पिके डोळ्यादेखत जळून खाक होत आहेत. तरी देखील शेतकऱ्यांच्या नदीकाठ व शेती पंपांची वीज कापली जात आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि महावितरणचे धोरण यामुळे शेतकरी कोलमडला आहे. पावसाने ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र बनत आहे. प्रशासनाने सार्वजनिक जल स्थळ परिसरातील वीजपुरवठा खंडीत केला आहे. एकाच प्रश्नासाठी चार-चार वेळा आंदोलन . बोरगाव येथील शेतकऱ्यांनी शेतीपंपांना सुरळीत वीज मिळावी यासाठी पोटेगाव सबस्टेशनवर तब्बल तीन वेळा आणि करमाळा महावितरण कार्यालयात एक वेळा आंदोलन केले. . मांगी, वडगाव दक्षिण, हिवरवाडी, रावगाव व भोसे येथील शेतकऱ्यांनी मांगी सबस्टेशनवर आंदोलन करून करमाळा महावितरण कार्यालयात तीन ते चार वेळा निवेदने दिली. . सावडी येथील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर मशाल आंदोलन केले. युवा सेनेचे शंभूराजे फरतडे आणि पंचायत समिती सदस्य भरत आवताडे यांच्या नेतृत्वाखाली कोळगाव सबस्टेशनवर तीन वेळा निवेदन देत एकदा रास्ता रोको आंदोलन केले. . पोथरे आणि करंजे येथील शेतकऱ्यांनीही करमाळा महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. तरीही महावितरणच्या अधिकाऱ्यांना मात्र ऐन उन्हाळ्यात ही घाम फुटला नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर