ब्रेकिंग न्यूज
⚡ पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसवर काळाचा घाला, थेट पूलावरून खाली कोसळली गाडी, 21 हून अधिक प्रवासी बसमध्ये ✦ ⚡ News18 Marathi Headlines | 13 NOV | 9 AM | Sanjay Shirsat News | NCP Merger | Shiv Sena | Fadnavis ✦ ⚡ अवघ्या 10 हजारांची गुंतवणूक करेल मालामाल, मधमाशी पालनाचा दुहेरी फायदा, शेतकऱ्यांनी काय करावं? Video ✦ ⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह…
SP News Maregaon

‘ड्रोन’मुळे धास्ती, चोरांच्या टोळ्यांची श्रीरामपूर परिसरात पसरली अफवा:विनापरवाना ड्रोन पाडण्याची पोलिसांची तयारी; बेलापूरमध्ये ग्रामस्थांचा संताप‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


श्रीरामपूर आणि विशेषतः बेलापूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अवकाशात फिरणाऱ्या संशयास्पद ‘ड्रोन’मुळे नागरिकांमध्ये तीव्र घबराट पसरली आहे. रात्रीच्या वेळी अचानक दिसणाऱ्या या ड्रोनचा संबंध थेट चोरी करणाऱ्या टोळ्यांशी जोडला जात असून, तालुक्यात विविध प्रकारच्या अफवांना उधाण आले आहे. यामुळे ग्रामस्थांची झोप उडाली असून, रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या गंभीर समस्येवर बेलापूरच्या ग्रामसभेत अत्यंत वादळी चर्चा झाली. रात्रीच्या वेळी लोकवस्तीवर घिरट्या घालणारे हे ड्रोन नेमके कोणाचे आहेत? ते कोणत्या उद्देशाने फिरवले जात आहेत? आणि यामागे कोणती टोळी सक्रिय आहे का? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत. ड्रोनच्या या वाढत्या सुळसुळाटाबाबत प्रशासनाने तत्काळ अधिकृत खुलासा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक स्तरावरून देण्यात आला आहे. नागरिकांमधील वाढता संताप आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता, या समस्येचे निवारण करण्यासाठी तातडीने विशेष बैठकही घेण्यात आली. या संदर्भात पोलीस प्रशासनाने महत्त्वाचा खुलासा करत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री आकाशात दिसणारे ड्रोन आणि चोरांच्या टोळ्यांचा परस्परांशी कोणताही संबंध नसून, या केवळ अफवा असल्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, नागरिकांची सुरक्षा आणि भीती लक्षात घेता, येत्या काही दिवसांत विनापरवाना फिरणारे हे संशयास्पद ड्रोन पाडण्याची कडक कायदेशीर कार्यवाही पोलिसांकडून केली जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. तसेच परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास नागरिकांनी स्वतः कायदा हातात न घेता थेट पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी संजय गांधी निराधार कमीटीचे अध्यक्ष शरद नवले, अभिषेक खंडागळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष दिलीप थोरात, अल्ताफ शेख, सचिन वाघ, पोलीस पाटील शिवाजी भोसले, पत्रकार विष्णुपंत डावरे आदिंची मनोगत व्यक्त केले. या वेळी प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अरुण पाटील नाईक, बाळासाहेब दानी विलास थोरात आदी उपस्थित होते. मुख्य समस्या आणि वस्तुस्थिती रात्रीच्या वेळी लोकवस्तीवर फिरणाऱ्या ड्रोनमुळे महिला व बालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. नागरिक भयभीत झाले आहेत. सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर या ड्रोनचा संबंध चोरीच्या घटनांशी जोडला जात आहे. त्यामुळे रात्री अनेक नागरिकांची झोप उडाली आहे. चोरट्यांची टोळी तर ड्रोन उडवत नाही ना? अशी भीती नागरिकांत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर