ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

सोलापूर मनपासाठी MVA चा फॉर्म्युला निश्चित:काँग्रेस 45, ठाकरे गट 30, पवार गट 20, माकपला 7 जागा; काँग्रेसचे 20 उमेदवार जाहीर

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोलापूर महापालिकेसाठी जागावाटपाची घोषणा केली आहे. त्यात काँग्रेस सर्वाधिक 45 जागांवर लढणार असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 30 जागांवर लढणार आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व माकपलाही सन्मानकारक जागा देण्यात आल्या आहेत. काँग्रेसने आपल्या 20 उमेदवारांच्या नावाची घोषणाही केली आहे. 102 सदस्यीय सोलापूर महापालिकेत सत्ताधारी महायुती विरुद्ध विरोधी बाकावरील महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीने जागावाटपाचा मुद्दा निकाली काढून महायुतीवर आघाडी घेतली आहे. मविआच्या जागावाटपानुसार, काँग्रेस 45, ठाकरे गट 30, शरद पवार गट 20 व माकप 7 जागांवर निवडणूक लढणार आहेत. महाविकास आघाडी 4 जानेवारी रोजी आमच्या प्रचाराचा नारळ फोडेल. खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, नरसय्या आडम मास्तर, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदी नेते प्रचाराच्या शुभारंभाला उपस्थित राहतील, असे ठाकरे गटाचे शहरप्रमुख अजय दासरी यांनी सांगितले. जागावाटपावर ठाकरे गटात किरकोळ नाराजी महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक जागा आल्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. ठाकरे गटाचे उत्तर विधानसभा प्रमुख महेश धाराशिवकर यांनी या प्रकरणी अजय दासरी यांना जाब विचारला. यावेळी त्यांच्यात काहीशी बाचाबाचीही झाली. ही बाचाबाची एकमेकांना पाहून घेण्यापर्यंत गेली. याामुळे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे ठाकरे गटाला निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे. वंचितचा महाविकास आघाडीला प्रतिसाद नाही महाविकास आघाडीने सोलापुरात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वंचितसह आम आदमी पक्षालाही सोबत येण्याचे आवाहन केले. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. माजी आमदार नरसय्या आडम यांनीही ही माहिती दिली. ठाकरे गट मनसेला आपल्या कोट्यातून जागा देणार ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी यावेळी आपला पक्ष आपल्या कोट्यातून मनसेला काही जागा सोडणार असल्याचे स्पष्ट केले. जागावाटप करताना आम्ही सर्वच पक्ष दोन-दोन पाऊले मागे आलो आहोत. निवडून येणे हा एकमेव निकष या प्रकरणी आम्ही ठरवला आहे. मनसेने 5 जागांची मागणी केली आहे. आम्ही आमच्या कोट्यातून त्यांना जागा देऊ. आम्ही हा प्रश्न समन्वयाने निकाली काढू. निवडणुकीत आघाडी म्हटले की काही वाद होतातच. त्यावर तोडगा काढला जाईल, असे त्या म्हणाल्या. काँग्रेसचे 20 उमेदवार जाहीर दुसरीकडे, नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. आता पक्ष महानगरपालिका निवडणुकांसाठी जय्यत तयारीनिशी उतरत आहे. त्यानुसार, आज काँग्रेसने सोलापूर महापालिकेसाठी 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दोन दिवसापूर्वी मुंबईत राज्य निवड मंडळाच्या बैठकीत हे उमेदवार निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार सोलापूरसाठी ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाने दिली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर