ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

तीव्र उन्हाळ्यात ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती:दहीहंडा परिसरात तीव्र टंचाई; जलवाहिनीच्या निकृष्ट कामामुळे पाणी गावात न येता जाते वाहून‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दहीहंडा गावात पाणीपुरवठा योजना फसली असून नागरिकांवर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. भर उन्हाळ्यात ४५ अंश सेल्सिअस तापमानात महिला, लहान मुले, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, असे दहीहंडा विकास मंचाचे म्हणणे आहे. दहीहंडा गावाला ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेतून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष टंचाई ग्रस्तगाव योजनेतून पूर्णा नदी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती, असे दहीहंडा विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तब्बल १४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या योजनेतून गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, निकृष्ट दर्जाची पाइपलाइन, बोअरवेल व अपूर्ण कामांमुळे पाणी गावात न पोहोचता थेट नाल्यात वाहून जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी दहीहंडा विकास मंचच्या वतीने प्रा. डॉ. विजय आठवले, किशोर सिरसाठ, संजय खाडे, दीपक भांडे, राहुल आठवले, शत्रुघ्न आठवले, राजू लाड, नीलेश जैन, अजय आठवले व अन्य नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले असून प्रशासन नेमकी काय भूमिका घेतली याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. एकीकडे लाखो रुपये खर्च करून पाणी नाल्यात वाहून जात असल्याचा आरोप दहीहंडा विकास मंचच्या वतीने होत असताना, दुसरीकडे गरीब शेतमजूर, शेतकरी व सामान्य कुटुंबांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. ४५ अंश सेल्सियस तापमानात महिलांची, वृद्धांची आणि लहान मुलांची पाण्यासाठी धावपळ होत आहे. गावातील अनेक भागांमध्ये टँकरसमोर पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. टँकरद्वारे पाणी मिळत असताना पाण्यासाठी हाल होत आहेत, असे दहीहंडा विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लाखो रुपये खर्च करूनही ग्रामस्थ टँकरवर अवलंबून; पाण्यासाठी होते मोठी गर्दी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर