ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मोफत योजनांमुळे राज्यांची आर्थिक स्थिती धोक्यात -आर्थिक सर्वेक्षण:चालू आर्थिक वर्षात तिजोरीवर 1.7 लाख कोटींचा बोजा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


संसदेत गुरुवारी सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात थेट रोख हस्तांतरण योजनांबाबत कठोर टिप्पणी करण्यात आली आहे. सरकारने म्हटले की, राज्यांमध्ये महिलांसाठीच्या या योजनांमुळे चालू आर्थिक वर्षात १.७ लाख कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे. या योजनांचे फायदे अल्पकालीन आहेत, मात्र त्या आर्थिक स्थिरता व मध्यम-मुदतीच्या वाढीबद्दल चिंता निर्माण करतात. गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणात सरकारने म्हटले होते की, रोख हस्तांतरण व कर्जामुळे सकारात्मक परिणाम होत असून, कुटुंबे मूलभूत गरजा पूर्ण करण्यात व कर्ज फेडण्यात सक्षम होत आहेत. सर्वेक्षणात नमूद केले आहे की, २०२२-२३ आणि २०२५-२६ दरम्यान अशा योजना लागू करणाऱ्या राज्यांची संख्या ५ पटीने वाढली आहे. यापैकी सुमारे निम्मी राज्ये महसुली तुटीत असण्याचा अंदाज आहे. एका अभ्यासाचा दाखला देत सर्वेक्षणात म्हटले आहे की, हे हस्तांतरण राज्यांच्या जीडीपीच्या ०.१९-१.२५% आणि एकूण अर्थसंकल्पीय खर्चाच्या ०.६८-८.२६% पर्यंत आहे. दरम्यान, या वर्षी पुद्दुचेरीसह पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या चार मोठ्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत, ज्यापैकी केवळ एका राज्यात भाजपचे सरकार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर