ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG दरांचा भडका:रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार? मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्येही दरवाढ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आधीच नागरिक त्रस्त असताना आता सीएनजीच्या दरवाढीने सर्वसामान्य वाहनधारकांची चिंता आणखी वाढली आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर वारंवार वाढल्यानंतर आता सीएनजीचे दरही भडकले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये सीएनजीच्या किंमतीत वाढ झाल्याने रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या मासिक बजेटवर मोठा परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. पुण्यात एमएनजीएल कंपनीने सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपये 50 पैशांची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे शहरातील सीएनजीचा दर 92 रुपये 25 पैशांवरून थेट 94 रुपये 75 पैशांवर पोहोचला आहे. वाढीव दर 27 मेच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले. इनपुट गॅसचा खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ करावी लागल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे. या वाढीचा थेट परिणाम रिक्षा, टॅक्सी चालकांसह दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांवर होणार आहे. प्रवासखर्च वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. शहरातील चिकलठाणा परिसरातील बीपीसीएल पंपावर सीएनजीचे दर किलोमागे 2 रुपयांनी वाढले आहेत. गेल्या 15 दिवसांत येथे सीएनजीच्या किंमतीत 12 रुपयांची वाढ झाल्याने वाहनधारक संतप्त झाले आहेत. शहरात सध्या पेट्रोलचा दर 112 रुपये 88 पैसे प्रति लिटर, तर डिझेलचा दर 99 रुपये 50 पैसे इतका आहे. पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजीही महाग झाल्याने पर्यायी इंधनाचा फायदा कमी होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. नाशिकमध्येही सीएनजीच्या दरात वाढ झाली असून प्रति किलो 1 रुपया 35 पैशांची वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे शहरात सीएनजीचा नवा दर 96 रुपये 50 पैसे प्रति किलो झाला आहे. यापूर्वी वाहनधारकांना 95 रुपये 15 पैशांमध्ये सीएनजी उपलब्ध होत होते. 28 मेपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत. आखाती भागातील युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन दरवाढ याचा परिणाम आता सीएनजीवरही होत असल्याचे बोलले जात आहे. रिक्षा, टॅक्सी आणि कॅब सेवांचे भाडे वाढण्याची शक्यता दरम्यान, पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या तिन्ही इंधनांच्या वाढत्या दरांमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः रिक्षा, टॅक्सी आणि कॅब सेवांचे भाडे वाढण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. सीएनजीचे दर झपाट्याने वाढत असल्यामुळे हे इंधनही लवकरच शंभरी पार करेल, अशी भीती वाहनधारक व्यक्त करत आहेत. सततच्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांकडून सरकारने तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर