ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मालेगाव महापालिकेत काँग्रेसची हुशार खेळी:इस्लाम पार्टीला पाठिंबा देत शिंदे गटाचा डाव उधळला; आता सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काँग्रेसने मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टीला पाठिंबा देत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. काँग्रेसच्या या हुशार खेळीमुळे येथे सत्ता स्थापन करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न उधळला गेला आहे. मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टीला सर्वाधिक 35 जागा निवडून आल्या आहेत. येथे एमआयएमला 21, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेला 18 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या या महापालिकेत अवघ्या 3 जागा मिळाल्या, तर समाजवादी पार्टीच्या खिशात 5 जागा गेल्या. येथे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामुळे शिंदे गटाने एमआयएमला हाताशी धरून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. पण काँग्रेसने आज इस्लाम पार्टीला पाठिंबा जाहीर करून सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला. समाजवादी पार्टीने यापूर्वीच इस्लाम पार्टीला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे तिन्ही पक्षांचे मिळून 43 नगरसेवक झाले आहेत. यामुळे मालेगाव महापालिकेत कुणाची सत्ता येणार? हा प्रश्न निकाली निघाला आहे. काँग्रेसने अवघ्या 3 जागा असतानाही एमआयएम व शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा डाव टाकला आहे. इस्लाम पार्टीची एमआयएमशीही चर्चा दुसरीकडे, इस्लाम पार्टीने स्थिर प्रशासन देण्यासाठी एमआयएमचा पाठिंबा मिळवण्याचाही प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकरणी इस्लाम पार्टीच्या शिष्टमंडळाने एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची मागणी केली. त्यावर दोन्ही पक्षांत साधक-बाधक चर्चा झाल्याची माहिती आहे. पण अद्याप एमआयएम इस्लाम पार्टीला पाठिंबा देणार की विरोधी बाकावर बसणार? हे स्पष्ट झालेनाही. पण काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे मालेगावच्या सत्तेच्या चाव्या इस्लाम पार्टीच्या हातात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाने मागितला एमआयएमकडे पाठिंबा उल्लेखनीय बाब म्हणजे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मालेगावात सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाने आपल्याशी संपर्क साधल्याचा दावा करून एकच खळबळ उडवून दिली होती. शिंदे गटाने मालेगावात एमआयएमला पाठिंबा देण्यासंबंधीचा प्रस्ताव दिला होता. पण आम्ही तो फेटाळून लावला, असे ते म्हणाले होते. हिंदुत्त्वाचे राजकारण करणाऱ्या शिंदे गटाने एमआयएमपुढे मैत्रीचा हात पुढे केल्यामुळे त्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती. हे ही वाचा… साने मुसलमानांमुळे निवडून आला:आमदार बाई भेटू देत नव्हती, गिरीश महाजन – राहुल ढिकले यांच्या संवादाची क्लिप व्हायरल; VIDEO
नाशिक महापालिका निवडणुकीत मुस्लिम मतांमुळे भाजपचा अजिंक्य साने नामक उमेदवार निवडून आल्याचा दावा करणारा मंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मंत्री महाजन ‘आमदार बाई भेटू देत नव्हती’ असे विधान करतानाही दिसून येत आहेत. यावेळी त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे असल्याचा दावा केला जात आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर