ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

नगरपालिकेत लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला सदस्यत्व:स्वीकृत सदस्य करताना लाज वाटली नाही? संजय राऊतांचा भाजपला सवाल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अंबरनाथमध्ये भाजपकडून लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला नगरपालिकेचे सदस्यत्व दिले असून यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. त्याला तुम्ही स्वीकृत सदस्य करतात, तुम्हाला काही लाजा वाटत नाही? असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी एक निवडणूक दाखवावी ज्यात त्यांनी हिंदू-मुस्लिम वाद लावलेला नाही, माझ्याकडून मी 11 लाख इनाम देईल, असे थेट आव्हान राऊतांनी केले आहे. संजय राऊत म्हणाले, भाजपला असे वाटते की जनता मूर्ख आहे. त्यांनी केलेल्या सर्व पापकर्मांना जनता मान्यता देईल, असे त्यांना वाटते. माघार घेण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे. एमआयएमसोबत जेव्हा युती केली आणि गोंधळ झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांना सांगावे लागले, अंबरनाथमध्येही कॉंग्रेससोबत युती केली तेव्हाही मुख्यमंत्र्यांना समोर येऊन सांगावे लागले की ही युती नाही. तरीही निर्लज्जपणे अंबरनाथ-बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील एक संशयित आरोपी, तुषार आपटे, ज्याच्याविरोधात मोठा रोष निर्माण झाला होता, त्यांना अटक झाली होती आणि उघडपणे ते संघाचे काम करतात आणि त्यांना तुम्ही निर्दोषत्व सिद्ध न होता स्वीकृत सदस्य करतात अंबरनाथ नगरपालिकेत. एवढे धाडस यांच्यात येते कुठून? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राचे काय करून ठेवले आहे? पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, मी संशोधन करणार आहे. भाजपमध्ये त्यांच्यात एवढे धाडस येते कुठून? महाराष्ट्रात ज्या विषयावर लैंगिक अत्याचार प्रकरणी संतापाची लाट उसळली होती, त्या प्रकरणातील आरोपी, त्याला तुम्ही स्वीकृत सदस्य करतात, तुम्हाला काही लाजा वाटत नाही? ते असतील संघाचे कार्यकर्ते, केली असेल भाजपला मदत म्हणून त्याला ही बक्षिसी देता? उत्तर प्रदेशमध्ये तो एक बलात्काराचा आरोपी सोडला. तिथे निर्लज्जपणा दिसला तोच इथे दिसला. या महाराष्ट्राचे काय करून ठेवले आहे? हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. त्यांचे जे शिलेदार लोक आहेत भाजपचे किंवा फडणवीसांचे ते मोकाट सुटले आहेत. आम्ही काही केले तरी आमचा बॉस वर्षा बंगल्यावर बसला आहे आणि तो आम्हाला पाठीशी घालेल हा जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे, त्यातून या गोष्टी घडत आहेत. मुंबई पालिकेत हिंदू-मुस्लिम करतायत उद्धव ठाकरेंनी असे चॅलेंज केले आहे की एक अशी निवडणूक देवेंद्र फडणवीसांनी दाखवावी ज्यात त्यांनी हिंदू-मुस्लिम असा वाद लावलेला नाही आणि असे नसेल तर मी त्यांना एक लाख रुपये इनाम देईल. यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, उद्धव साहेबांचे एक लाख रुपये आणि माझे अधिक 5 लाख रुपये. कधीही घेऊन जाऊ शकतात. त्यांना अमाऊंट वाढवायची असेल तरी चालेल. 11 लाख रुपये देईल मी. एक निवडणूक दाखवा ज्यात हिंदू-मुस्लिम किंवा भारत-पाकिस्तान असा वाद लावलेला नाही. फडणवीस सारख्या शूर माणसाने हे आव्हान स्वीकारायला पाहिजे. मुंबई पालिकेत हिंदू-मुस्लिम करत आहेत. इथे पण अयोध्या आणत आहेत. आमचे सगळे आयुष्य या मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी गेले आहे. हा विकासच आहे. बाकी इनफ्रास्ट्रक्चर आहेच. राज्याचे मुख्यमंत्री आहात, कशाला खोटे बोलायचे? असेही राऊत म्हणाले. ठाकरे कुटुंबाची बदनामी म्हणजे महाराष्ट्राची बदनामी देवेंद्र फडणवीस असेही म्हणाले की मी राज ठाकरेंकडे कधीही जाऊ शकतो पण उद्धव ठाकरे यांनी माझ्यासाठी दरवाजे बंद केले आहेत. यावर संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे खरे बोलतात. त्यांनी जो धोंडा गळ्यात बांधला आहे शिवसेनेच्या नावाखाली, तो त्यांना बुडवणार. म्हणजे कसे आहे की वेश्येच्या गळ्यात मणीहार आणि पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा, अशा प्रकारचे धोरण भाजपच्या अमित शहा यांनी राबवले. उद्धव ठाकरेंसारखा सच्चा मित्र त्यांनी गमावला आहे, प्रखर हिंदुत्ववादी. भाजपला ज्याने हिंदुत्वाचा मार्ग दाखवला ते बाळासाहेब ठाकरे आहेत. मातोश्री हे हिंदुत्वाचे सर्वात मोठे केंद्र आहे. ठाकरे कुटुंबाची बदनामी म्हणजे महाराष्ट्राची बदनामी. ही बदनामी थांबवा, आम्ही त्यांचे स्वागत करू.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर