ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

एटीएसकडून यवतमाळ-अहिल्यानगरमध्ये छापेमारी:दहशतवादी कनेक्शनच्या संशयाने खळबळ, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) राज्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. मुंबई ATS ने सकाळपासून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड येथे 14 ठिकाणी आणि अहिल्यानगर (अहमदनगर) येथे 7 ठिकाणी शोधमोहीम सुरू केली. काही तरुणांना दहशतवादी संघटनांशी संपर्क साधून सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची गुप्त माहिती ATS ला मिळाली होती. एटीएसने सर्वात मोठी कारवाई विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात केली आहे. जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड या दोन शहरांमध्ये तब्बल 14 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. एटीएस प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या थेट नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली जात असून, एकट्या यवतमाळ जिल्ह्यात एटीएसची 20 पथके तैनात आहेत. या कारवाईत वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिसांचा मोठा ताफा सहभागी आहे. अहिल्यानगरमधील मुकुंदनगर या भागात एटीएसने 7 ठिकाणी छापेमारी केली. गेल्या काही काळात औरंगजेबाचे उदात्तीकरण आणि आक्षेपार्ह घोषणाबाजीमुळे हा भाग चर्चेत आला होता. काही तरुण दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची आणि त्यांना सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर एटीएसने ही गोपनीय कारवाई केली. दहशतवादी संघटनांशी संपर्क असल्याचा संशय काही तरुण दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असून ते सक्रिय होत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएस प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करण्यात आली. या मोहिमेत वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागातही रात्रीपासून ही कारवाई सुरू आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न आज महाशिवरात्र असल्याने राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी आहे. तसेच शिवजयंती आणि इतर सण-उत्सव तोंडावर आहेत. याच काळात राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एटीएसने ही तातडीची पावले उचलली आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे. रात्रभर चाललेल्या या मोहिमेत अनेक संशयितांची कसून चौकशी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तरुणांना आणि संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, अद्याप कुणालाही अधिकृतपणे अटक केल्याची माहिती समोर आलेली नाही. ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने राबवली जात असून, यातून मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर