ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मंत्रालयातील प्रकाराने माझ्या प्रतिमेला डाग लागला:अशा घटना घडल्यावर मानसिक त्रास होतोच, नरहरी झिरवाळांचे लाच प्रकरणावर थेट विधान

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागात परवान्यांच्या नावाखाली मंत्रालयात सुरू असलेल्या ‘कोडिंग’ लाचखोरीच्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारावर स्वतः मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली असून, “हा प्रकार गलिच्छ असून माझ्यासारख्या माणसाच्या प्रतिमेला यामुळे डाग लागला आहे. अशा घटना घडल्या की मानसिक त्रास होतोच” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. औषध विक्रेत्यांच्या परवान्यांमध्ये त्रुटी आढळल्यास एफडीएचे इन्स्पेक्टर दुकानदारांचा परवाना निलंबित करतात. या निलंबनाविरुद्ध मंत्र्यांकडे दाद मागण्याची तरतूद आहे. मात्र, या प्रक्रियेत मंत्र्यांच्या दालनातच भ्रष्टाचार फोफावल्याचा आरोप झाला आहे. मंत्री झिरवाळांचे पीए रामदास गाडे आणि क्लर्क डेरिंगे हे खुद्द मंत्र्यांच्या अनुपस्थितीत अपील ऐकत होते. परवाना पुन्हा सुरू करण्यासाठी कोडिंगच्या भाषेत लाखो रुपयांची मागणी केली जात असल्याचे स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले आहे. एका खासगी वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून हे प्रकरण समोर आले होते. ज्यांनी उघड केले, त्यांना त्रास झाला असेल या प्रकरणावर बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले, “ज्या कुणी हे स्टिंग ऑपरेशन केले, त्यांनी ते शत्रू म्हणून केले नाही. त्यांना कामात त्रास झाला असावा, म्हणून त्यांनी हे सत्य बाहेर आणले आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून जे काही असेल ते सत्य लवकरच बाहेर येईल. अशा घटनांमुळे मानसिक त्रास होतो.” अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबी अजित पवार यांच्या निधनानंतरच्या राजकीय परिस्थितीवरही झिरवाळ यांनी भाष्य केले. “राज्याच्या गरजेचा माणूस गेला याचे दुःख मोठे आहे. अशा काळात माझ्या दालनात हे जे काही घडले, ते अत्यंत चुकीचे आहे. मी माझ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, कुठेही कलंक लागेल असे काम करू नका. पारदर्शक पद्धतीने काम करा,” अशी तंबीही त्यांनी दिली. अदिवासी संघटना आणि सरकारमधील स्थान ‘बिऱ्हाड’ आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हे केवळ आदिवासींचे आंदोलन नव्हते, तर त्यात सर्व समाजाचे नेते होते. तसेच, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आपल्याला नेहमीच योग्य मान-सन्मान मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल बोलताना, त्यांना दादांच्या जागी योग्य स्थान मिळावे ही सर्वांचीच भावना असल्याचेही झिरवाळ यांनी सांगितले. लिपिकाची प्रतिनियुक्ती रद्द दरम्यान, या प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कठोर भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. लिपिक राजेंद्र ढेरिंगेविरोधात कठोर कारवाईचे आदेश झिरवाळ यांनी दिले आहेत. तसेच केवळ चौकशीच नव्हे तर त्याची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागातील दक्षता पथकाला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून, वस्तुनिष्ठ व सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले आहे. हे ही वाचा… झिरवळांच्या कार्यालयातील व्यवहाराच्या स्टिंगचा धक्कादायक व्हिडिओ:एक लाईन 50 हजार, दोन लाईन 1 लाख मंत्रालयातील लाचखोरीचा कोड उघड मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागात लाचखोरीचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात कर्मचाऱ्याला 35 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्टिंगच्या माध्यमातून उघड झालेल्या या प्रकरणात पैशांच्या व्यवहारासाठी खास ‘लाईन’चा गुप्त संकेत वापरला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर