ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

रामदास आठवलेंची शरद पवारांना थेट ऑफर:म्हणाले- थेट भाजपमध्ये जायचं नसेल तर RPI मध्ये या, मी तुम्हाला सोबत घेऊन जातो

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान आता रामदास आठवले यांनी शरद पवारांना थेट भाजपसोबत येण्याची मोठी ऑफर दिली आहे. “शरद पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू नये, तर त्यांनी आमच्यासोबत यावे,” असे जाहीर निमंत्रण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे (RPI) प्रमुख रामदास आठवले यांनी दिले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आठवलेंच्या या गुगलीमुळे राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे. थेट भाजपमध्ये जायचं नसेल तर आरपीआयमध्ये या
रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत शरद पवारांना सूचक सल्ला दिला. ते म्हणाले, शरद पवारांनी काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी आमच्यासोबत यावे. जर त्यांना थेट भाजपमध्ये जायचे नसेल, तर त्यांनी माझ्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’मध्ये (RPI) सोबत यावे. आम्ही स्वतः त्यांना सन्मानाने भाजपसोबत घेऊन जाऊ. काँग्रेसमध्ये आता दम राहिला नाही- आठवले
काँग्रेस पक्षावर टीका करताना आठवले पुढे म्हणाले, आता काँग्रेसमध्ये आधीसारखा तो दम राहिलेला नाही. नजीकच्या काळात काँग्रेसला चांगले भविष्य दिसेल, अशी सध्यातरी परिस्थिती नाही. त्यामुळे पवारांनी तिथे जाऊ नये, असे आठवले म्हणाले. दरम्यान, आठवलेंच्या या जाहीर ऑफरवर अद्याप पवार गटाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. आशिष देशमुखांचा खळबळजनक दावा: शरद पवारांना राज्यसभेचे विरोधी पक्षनेते, उद्धव ठाकरेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद मिळवून देण्याचा डाव राज्यात काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला असतानाच भाजप नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी एक मोठा राजकीय दावा करून खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन्ही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हावेत, यासाठी काही नेते प्रयत्नशील असल्याचा आरोप त्यांनी केला. देशमुख यांनी नाव न घेता टीकास्त्र डागत म्हटले की, “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना” अशा भूमिकेतून काही जण महाराष्ट्राच्या राजकारणात विलीनीकरणाचा मुद्दा पुढे आणत आहेत. या संपूर्ण चर्चेमागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना काँग्रेसमध्ये महत्त्वाची पदे मिळवून देण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर