ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

‘ऑपरेशन टायगर’च्या वादळात संजय दिना पाटलांची सुळेंच्या लग्नात ‘व्हीआयपी’ एन्ट्री:ठाकरेंकडून 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस!

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना ठाकरे गटाचा व्हीप धुडकावून दिल्लीतील महत्त्वपूर्ण बैठकीला दांडी मारणारे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील काल सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्यात कॅमेऱ्यात कैद झाले. खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती आणि उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्या विवाहसोहळ्याला संजय दिना पाटील यांनी लावलेल्या हजेरीने राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे पक्षात मोठी बंडखोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांच्यासह 6 खासदारांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली असतानाच, दुसरीकडे पाटील यांनी सुळेंच्या कन्येच्या लग्नात घेतलेली ‘ग्रँड एन्ट्री’ सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. विवाहस्थळी पोहोचताच प्रसारमाध्यमांनी त्यांना घेरले, मात्र अधिक बोलणे टाळत कॅमेऱ्यासमोर हात दाखवून ते सोहळ्यासाठी आत निघून गेले.

सहाही खासदारांची बैठकीला दांडी या संपूर्ण राजकीय नाट्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ची पार्श्वभूमी आहे. ठाकरेंच्या पक्षात असलेल्या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याचे बोलले जात असून, यामध्ये संजय जाधव, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि स्वतः संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. या संभाव्य फुटीची कुणकुण लागताच ठाकरेंच्या शिवसेनेने गुरुवारी आणि शुक्रवारी नवी दिल्लीत संसदीय पक्षाची तातडीची बैठक बोलावली होती. सर्व खासदारांना उपस्थित राहण्यासाठी पक्षाकडून अधिकृत व्हीप बजावण्यात आला होता. मात्र, बंडखोरीच्या तयारीत असलेल्या या 6 खासदारांपैकी एकानेही या बैठकीला हजेरी लावली नाही. दिल्लीतील या महत्त्वाच्या बैठकीला केवळ संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे चारच खासदार उपस्थित होते. ठाकरे गटाने उगारला कारवाईचा बडगा खासदार संजय दिना पाटील यांनी ठाकरेंच्या शुक्रवारच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते, मात्र प्रत्यक्षात ते बैठकीला पोहोचलेच नाहीत. खासदारांची अनुपस्थिती पाहून दिल्लीतील बैठकीच्या ठिकाणाहूनच नेत्यांनी संजय दिना पाटील यांना फोन लावला. त्यावर, मी विमान पकडले असून लगेच बैठकीच्या ठिकाणी पोहोचत आहे, असे सांगितले होते. मात्र, शेवटपर्यंत ते बैठकीला आलेच नाहीत. ते पक्षाशी आणि नेत्यांशी खोटे बोलत असल्याचे उघड झाल्यानंतर अखेर पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे त्यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर