ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पार्थ पवारांना मुख्यमंत्र्यांचे कवच:मराठी शाळा बंद पडतायत? मग आत्मचिंतन करा, भारत माता विकणे ही गुलामी नाही का?- संजय राऊत

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मराठी शाळा का बंद पडत आहेत याचे आत्मचिंतन मराठी समाजाने केले पाहिजे. आम्ही आपले मुले मराठी शाळेत का घालत नाही, मराठी शाळेत न टाकता इंग्रजी शाळेत मुले टाकण्यावर आपला भर दिसून येतो आहे, काही जणांची मुले परदेशात शिकण्यासाठी जात आहेत, मराठी शाळा बंद पडण्यामागे कोणते सरकार किंवा शिक्षणमंत्री जबाबदार नाही तर मराठी माणूसही तितकाच जबाबदार आहे, असे असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात कायद्यापुढे सर्व जण समान नाहीत हे सिद्ध होत आहे. पार्थ पवार यांच्या पाठिशी मुख्यमंत्री असल्याने त्यांना काही त्रास होत नाही. अशा प्रकरणात विरोधकांचे नाव आले असते तर हे प्रकरण खूप पुढे गेले असते, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर VSR कंपनीच्या विमानाला उड्डानबंदी करण्यात आली हा रोहित पवारांचा विजय आहे. ते यापुढेही लढाई लढतील. मोदींनी देश विकला संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी देश अदानींना विकला असून उरलेला देश आता अमेरिकेला विकला आहे. राहुल गांधी सत्य बोलत आहे, उद्योगपती मित्रांसाठी आणि काही फाईल्स थांबवण्यासाठी भारत मातेला विकले. देश विकणे म्हणजे गुलामी नाही का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. एकत्रित बसून चर्चा करू संजय राऊत म्हणाले की, राज्यसभेची एक जागा जर मविआला मिळणार असेल तर ती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांना एकत्र बसून निर्णय घ्यावे लागतील ना मग त्यामध्ये बातमी असे काही नाही. विधान परिषदेची एक आणि राज्यसभेची एक जागा आहे त्यासाठी एकत्रित बसून निर्णय घेतल्याशिवाय कोणतीही निवडणूक पुढे जाणार नाही. त्यादृष्टीने आमदारांची बैठक घेणे, नेत्यांची बैठक या गोष्टी आल्या. या निवडणुकीची तयारी देशभरात सुरू आहे. 36 जागा रिकाम्या होत आहे, यात महाराष्ट्रातील 7 जागा आहेत. महायुतीकडे 6 जागा निवडून आणण्याइतके बळ आहे. एका जागेवर आम्ही सर्व जण मिळून निर्णय घेणार आहोत. मविआमध्ये चर्चा होईल संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे सदस्य निवृत्त होत आहेत. रजनी पाटील, शरद पवार, फौजिया खान, प्रियांका चतुर्वेदी सदस्य निवृत्त होत आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष आपला उमेदवार पुन्हा निवडून जावा यासाठी मत व्यक्त करत आहे. पण जागा एक असल्याने कोण निवडून जाणार यावर 3 पक्षांमध्ये चर्चा होणार आहे. शरद पवार निवडणुकीला उभे राहणार आहेत त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्यांच्या उमेदवारीवर मविआमध्ये चर्चा होईल त्यानंतर आम्ही पुढे जावू. ..तो राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न संजय राऊत म्हणाले की, मविआमध्ये काही मतभेद नाहीत, आम्ही मविआ म्हणून एकत्र आहोत. विधीमंडळाच्या पायऱ्यावर झालेल्या आंदोलनात आमचे आमदार आहेत काही जणांना पोहचण्यासाठी वेळ झाला असेल. अजित पवार यांच्या पक्षाचे नेतृत्व कुणी करावे हे त्यांनी ठरवावे. त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष कोण होणार हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पार्थ पवार यांच्या पाठिशी मुख्यमंत्री असल्याने जमीन घोटाळा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण हे प्रकरण काही दबणार नाही. विरोधकांचे नेते किंवा त्यांचे कुटुंबिय यामध्ये असते त्यात तथ्य जर नसते तरीही हे प्रकरण खूप पुढे गेले असते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर