ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

भोंदू खरातच्या कार्यालयाची पुन्हा झाडाझडती:विशिष्ट औषधाची बाटली, कुजलेले पेढे, आतल्या कडीवर खरातच्याच हातांचे ठसे

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने पुन्हा एकदा खरातच्या कुख्यात कार्यालयाची झडती घेतली आहे. त्यात त्यांनी खरातविरोधात भक्कम पुरावे गोळा केलेत. या पुराव्यांच्या न्यायवैद्यक अहवालानुसार खरातच्या कार्यालयात आढळलेली विशिष्ट औषधाची बाटली, कुजलेले पेढे व केबिनच्या दरवाजाच्या आतील कडीवर खरातच्याच हातांचे ठसे आढळलेत. विशेष म्हणजे पीडित महिलांसोबत भोंदू खरातची झटापट झाल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचे या अहवालात नमूद असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. खरातशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. चाकणकरांशिवाय इतरही अनेक राजकारण्यांची नावे खरातशी जोडली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एसआयटीने शुक्रवारी अशोक खरातच्या कार्यालयाची झाडाझडती घेतल्याची माहिती पुढे आली आहे. खरातविरोधात एसआयटीकडे भक्कम पुरावे एसआयटीने अशोक खरातच्या कार्यालयातील अनेक गोष्टी जप्त केल्यात. यात अशोक खरात आपल्या भक्तांना देत असलेल्या विशिष्ठ औषधाची बाटली, कुजलेले पेढे, सॅनेटायझरची बाटली आदींचा समावेश आहे. या सर्व वस्तूंसह कार्यालयाच्या दरवाजाच्या आतील कडीवर खरातच्या हातांचे ठसे आढळले आहेत. खरात याच वस्तूंचा वापर करून पीडित महिलांना आपण सांगू ते करण्यास भाग पाडत होता, असा संशय आहे. या वस्तूंवर पीडित महिलांच्या हातांचे ठसे आढळले नाहीत. पण खरातने पीडितांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे अन्य काही पुरावे एसआयटीच्या हाती लागलेत. हेच पुरावे अशोक खरातला दोषी ठरवण्यासाठी महत्त्वाचे ठरतील असा दावा केला जात आहे. खरातवर तब्बल 16 गुन्हे, 8 बलात्काराचे उल्लेखनीय बाब म्हणजे भोंदू अशोक खरातवर शिर्डी, सिन्नर, नाशिक आदी वेगवेगळ्या भागांत तब्बल 16 गुन्हे दाखल झालेत. यात लैंगिक अत्याचाराशी संबंधित तब्बल 8 गुन्ह्यांचा समावेश आहे. सध्या खरात पोलिस कोठडीत आहे. त्याची कोठडी सोमवारी संपणार असल्यामुळे त्याला उद्या पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याचे काळे कारनामे पाहता त्याच्याभोवती चौकशीचा फास घट्टपणे आवळला जावा, यासाठी तपास यंत्रणेने अधिक खबरदारी घेतली आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना अद्याप फरार दुसरीकडे, अशोक खरातची पत्नी कल्पना अद्याप फरार आहे. गत 10 दिवसांपासून पोलिस तिचा शोध घेत आहेत. पण अद्याप ती हाती लागली नाही. पोलिसांनी या प्रकरणी कल्पनाच्या माहेरी जाऊन विचारपूस केली. तसेच तिच्या नातलगांचीही झाडाझडती घेतली. पण तिचा कोणताही थांगपत्ता अजून लागला नाही. त्यामुळे फरार कल्पना कुठे आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर