ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

कपाट कापून साडेआठ लाखांचे दागिने लंपास:मूर्तिजापुरातील व्यावसायिकाच्या घरात चाेरी‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मूर्तिजापूर-अकोला मार्गावरील दर्याव नगरसमोर शेतात वास्तव्यास असलेल्या एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. बेडरूमच्या खिडकीची लोखंडी जाळी आणि कपाटाचे लॉकर कापून चोरट्यांनी तब्बल ८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व मौल्यवान भांडी लंपास केली. ही घटना शनिवारी (दि. २४) रात्री घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, “प्रकाश कृषी सेवा केंद्रा’चे संचालक प्रकाश सोमाणी हे कुटुंबासह या शेतातील बंगल्यात राहतात. त्यांचा मुलगा आणि सून रायपूर येथे डॉक्टर असल्याने, सोमाणी दांपत्य त्यांना भेटण्यासाठी गेले होते. नवीन ठिकाणी जात असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांनी घरातील स्त्रीधन आणि मौल्यवान दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याचे ठरवले होते. मात्र, कामाच्या व्यस्ततेमुळे दोन-तीन दिवस उशीर झाला आणि याच काळात चोरट्यांनी डाव साधला. चोरट्यांनी पाठीमागील कंपाउंड भिंतीवरून उडी मारून बंगल्यात प्रवेश केला. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अकोला येथून पाचारण करण्यात आलेले श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनी (फिंगरप्रिंट एक्सपर्ट) तपास केला. श्वान रस्त्यापर्यंत आणि मागील देवळाच्या गेटपर्यंत जाऊन घुटमळले. न्याय संहितेच्या नवीन कलमांन्वये गुन्हा दाखल ब्रिटिशकालीन आयपीसी कायदे बदलल्यानंतर, या घटनेत मूर्तिजापूर पोलिसांनी नवीन कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (चोरी), ३३१(३) आणि ३३१(४) (रात्रीची घरफोडी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार या गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षेची तरतूद आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर