ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

भाजपला मुंडे – महाजनांची गरज नाही:सत्ताधारी शिवसेनेच्या प्रकाश महाजनांची टीका; ठाकरे गट – मनसेच्या युतीवरही साधला निशाणा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मनसेला सोडचिठ्ठी देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रकाश महाजनांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने मला 3 महिने ताटकळत ठेवले. त्यामुळे भाजपला आता मुंडे, महाजनांची गरज उरली नसल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणालेत. प्रकाश महाजन यांनी गत आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. पक्ष प्रवेशानंतर लगेचच त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता त्यांनी शिवसेनेचा मित्रपक्ष असणाऱ्या भाजपवरही शरसंधान साधले आहे. ते म्हणाले, मी भाजपमध्ये गेलो नाही. कारण, त्यांनी मला तब्बल 3 महिने ताटकळत ठेवले. मी त्यांची प्रवेश परीक्षा पास झालो नाही. पण ज्यांनी भाजपवर टीका केली, ते सर्वजण आज भाजपमध्ये आहेत. दिनकर पाटील भाजपवर बोलले, ते आज भाजपत आहेत. भाजपच्या घराला दार नाही, पण पहारेकरी आहेत हे सांगण्यासाठी मी सुधीर मुनगंटीवार यांना फोन केला. पण त्यांनी तो उचलला नाही. मी तीन महिने वाट पाहिली. कारण, मला हिंदुत्त्वावर काम करायचे होते. ठाकरे बंधूंवरही साधला निशाणा प्रकाश महाजन यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, ठाकरे बंधूंनी केव्हाच हिंदुत्त्व सोडले. त्यांना केवळ मुंबईतील आपले अस्तित्व टिकवायचे आहे. मोठ्या लोकांनी निष्ठा बदलली की विचार, देशहित असे म्हटले जाते. उलट गरिबांवर शेण खाल्ल्याचा आरोप होतो. मी 5 वर्षे मनसेत होतो. तिथे तपश्चर्या केली. आता माझ्यावर पैशांसाठी पक्ष सोडल्याची टीका करणारे लोक जनावरांच्या बाजारात दलाली करतात. आमच्यावर विठ्ठलाचे प्रेम नव्हते. विठ्ठलाच्या नातवाचे काम करायचे. मी म्हणालो होतो विठ्ठल बदलणार नाही, पण विठ्ठलाने लक्ष दिले पाहिजे की नाही? चंदूमामा सोडा, रशीद मामू आला छोट्या कार्यकर्त्याने निष्ठा सोडली की त्यांना गद्दार म्हटले जाते. मी आता अस्तित्व आहे तोपर्यंत शिवसेनेत राहणार. मी दोन्ही भावांना एकत्र येण्याचे आवाहन केले. पण ते मराठी माणसांपासून दूर जाताना दिसले. ते मला खटकले. चंदूमामा सोडा, रशीद मामू आला. पण ते राज ठाकरे यांना खटकले नाही. आता एकत्र आल्यानंतर अनेकजण आठवत आहेत. शिवेसना – मनसे युतीत मनसेला ज्या जागा पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे अनेकजण नाराज झालेत. ठाकरे गट व मनसेची युती झाली तेव्हा बाळा नांदगावकर कुठे गेले होते? असा सवालही प्रकाश महाजन यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नामुळे बाळा नांदगावकर मनसेत नाराज आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर