ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

200 हून अधिक तरुणांना थेट नोकरी:अभोणा महाविद्यालयात नामांकित कंपन्यांनी घेतल्या मुलाखती‎

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


डांग सेवा मंडळ, नाशिक आणि रेसोनन्स एंटरप्रेन्युअरशिप अँड एम्प्लॉयबिलिटी सोल्युशन्स प्रा. लि., पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अभोणा येथील डॉ. विजय बीडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित रोजगार मेळाव्यात ग्रामीण भागातील २०० हून अधिक युवक-युवतींची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रोजगार मेळाव्यात पियाजिओ, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा तसेच व्हॉस ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा. लि. या वाहन उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा तसेच बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘बी अप्रेंटिस’ आणि ‘ट्रेनी’ पदांच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १५ ते २२ हजार रुपयांपर्यंत मानधनासह अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाची सुविधा मिळणार आहे. रोजगाराच्या या संधीमुळे ग्रामीण भागातील युवक-युवतींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बीडकर होत्या. रेसोनन्स कंपनीचे विवेक शिनगारे हे ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते. रोजगार मेळाव्यास परिसरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सूत्रसंचालन प्रा. किशोर पवार यांनी केले. तर प्रा. दिनेश हळवे यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य डॉ. एन. बी. कोठावदे यांनी आपल्या प्रास्ताविकेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशा उपलब्ध संधींचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. हिंमत आयुष्य बदलते ^गावात रिकामे न बसता तरुणांनी बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी. कंपन्यांमध्ये काम केल्याने वेळेवर पगार तर मिळतोच, शिवाय शिकण्याची मोठी संधी मिळते. हीच हिंमत तुमचे आयुष्य बदलू शकते. – हेमलता बीडकर, अध्यक्षा, डांग सेवा मंडळ नाशिक

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर