ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणारे आता एकत्र येण्याची भाषा करताय:राऊत केवळ तोंडाने गोळाफेक करू शकता, आंदोलनात तुमची कुवत शून्य- नवनाथ बन

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्राच्या आंदोलनात कुठेही नव्हतात. तुम्ही केवळ तोंडाने गोळाफेक करू शकता या पलीकडे तुमची काहीही कुवत नाही. देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारा की नारायण राणे, कंगना यांचे घरं कोणी तोडली होती? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. ऑपरेशन टायगर, लांडगा ही भाषा संजय राऊतांना शोभत नाही, तुम्हाला ऑपरेशन गिधाडची भाषा जमते, तुम्ही लोकांना लुटण्याचे काम केले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे भगवा झेंडा उरलेलाच नाही. तुम्ही भगवा झेंडा सोडून काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. तुम्हाला हिरव्या झेंड्याची जास्त चिंता आहे. परंतू राज ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारांना मानतात, भगव्या झेंड्याला मानतात. राज ठाकरे तुमच्या हिरव्या झेड्याखाली एकत्र येणार नाहीत. मनपाच्या वेळी तुम्ही त्यांना सोबत घेतले आणि त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. तुमच्यासोबत युती करत मनसेच्या फक्त 6 जागा निवडून येऊ शकल्या. ते एकटे लढले असते तर जास्त जागा त्यांना मिळाल्या असत्या. याचा अनुभव राज ठाकरे यांना आला असेल, त्यामुळे ते तुमच्या सोबत येतील असे वाटत नाही.

मराठी कामगार आता भाजपसोबत नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी मुंबई विमानतळावर जाऊन आंदोलन करावे पण एक लक्षात घ्यावे की, ज्या मराठी कामगारांची लुट 25 वर्षे कामगार सेनेच्या नावाने करण्याचे काम तुम्ही करत होतात ते थांबवण्याचे काम भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. त्यांच्या नेतृत्वात मराठी कामगार एकवटला आहे हे तुम्हाला देखवत नाही. मराठी माणूस, कामगार जागा झाला आहे. कामगारांकडून खंडणी घेण्याचे काम संजय राऊत करत होते. भाजप आल्यापासून त्यांना वेतन मिळत आहे. त्यांची पिळवणूक बंद झाली आहे. तुम्ही कितीही आंदोलन केले तरी आता काहीही फरक पडणार नाही. कारण मराठी माणूस भाजपसोबत आहे. त्यावेळी तुमचे आई-वडील मराठीच होते का? नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत पत्राचाळ लुटत असताना तुमचे आई-वडील मराठीच होते का? भाजपचे नगरसेवक असोत की मुंबई भाजपचे अध्यक्ष असोत ते मराठी माणसांसोबत उभे आहेत. जेव्हा तुम्ही पत्राचाळ लुटली तेव्हा तुमचे आई-वडील मराठीच होते का? याचे उत्तर द्या, मग भाजपच्या नगरसेवकांना उत्तर द्या. आम्ही मराठी माणसाच्या पाठिशी आहोत म्हणून त्यांना इथेच घरं देतो आहोत तुमच्यासारखे त्यांच्यावर मुंबई सोडण्याची वेळ आम्ही आणली नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर