ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

नीट घोटाळ्यामुळे ४ विद्यार्थ्यांची आत्महत्या:पालकांचे संसार उद्ध्वस्त, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – राजू शेट्टी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नीट परीक्षा घोटाळ्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घोटाळ्यामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून आतापर्यंत चारहून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, खासदार राजू शेट्टी यांनी या घोटाळ्याला जबाबदार असलेल्या अधिकारी, दलाल आणि संस्थाचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शेट्टी यांनी म्हटले आहे की, या आत्महत्या नसून सरकारी अनास्थेने केलेल्या हत्या आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात आलेल्या ‘नीट’ वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारामुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या मानसिक तणावाखाली आहेत. गेल्या आठवड्यापासून सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि कोकण भागांत फिरताना नीट परीक्षार्थी पालक व विद्यार्थी हतबल झाल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या गरीब आणि मध्यमवर्गीय पालकांनी आपले आयुष्य पणाला लावले होते. अनेकांनी शेतजमीन विकली, तर काहींनी घर गहाण ठेवून किंवा विकून मुलांच्या कोचिंग क्लासेसची आणि शिक्षणाची फी भरली होती. पालकांनी कष्ट करून गोळा केलेला पैसा आणि मुलांची मेहनत या घोटाळ्यामुळे वाया गेली आहे. पेपरफुटी आणि गुणांमधील फेरफारमुळे पात्र विद्यार्थ्यांना डावलून पैसेवाल्यांना प्रवेश मिळत असल्याने प्रामाणिक विद्यार्थी तीव्र मानसिक तणावाखाली आहेत. शेट्टी यांनी आरोप केला की, पेपरफुटीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अवैध उलाढाल होते. सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांना शासकीय गोपनीय बैठका, परीक्षांचे नियोजन आणि कंत्राटांची माहिती आधीच कशी मिळते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पेपरफुटीचे धागेदोरे सत्तेसोबत असणाऱ्या लोकांच्या सभोवताली फिरत असल्याचा दावा करत, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर बुलडोझर फिरवण्याची हिंमत सरकारमध्ये आहे का, असा सवाल शेट्टी यांनी केला. सरकारमधील यंत्रणाच भ्रष्ट झाल्याने असे प्रकार घडत असल्याची टीकाही त्यांनी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर