ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

एअर इंडियाच्या इमारतीत साकारणार ‘नवे मंत्रालय’:सरकारने इमारत खरेदीसाठी 1601 कोटींचा निधी केला वर्ग, आठवडाभरात व्यवहार पूर्ण

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नरिमन पॉईंट येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या 22 मजली एअर इंडिया इमारतीच्या खरेदीचा गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या वित्त विभागाने या इमारत खरेदीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 1 हजार 601 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. खरेदी खताचा मसुदा सध्या विधी व न्याय विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, येत्या आठवडाभरात ‘ए.आय. ॲसेट हॉल्डिंग कंपनी’कडून ही इमारत खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर या इमारतीत ‘नवीन मंत्रालय’ साकारणार आहे. सध्याच्या मंत्रालयात विविध शासकीय विभाग आणि मंत्र्यांच्या कार्यालयांसाठी जागा प्रचंड अपुरी पडत आहे. यावर पर्याय म्हणून मंत्रालयाच्या प्रांगणातच सध्या पाच मजली नवीन इमारत उभारण्यात येत आहे. यातच आता एअर इंडिया इमारतीची खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष कायदा सल्लागाराची नेमणूक केली आहे. सल्लागाराने तयार केलेल्या कागदपत्रांना मंजुरी मिळताच, एअर इंडियाच्या दुय्यम मालमत्ता आणि कर्जाचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘एआयएएचएल’ कंपनीसोबत अंतिम खरेदीचा व्यवहार केला जाईल. भाड्यापोटी जाणारे 200 कोटी वाचणार मंत्रालयात जागा नसल्यामुळे सध्या शासनाचे अनेक महत्त्वाचे विभाग फोर्ट परिसरातील खासगी इमारतींमध्ये भाड्याने सुरू आहेत. या कार्यालयांच्या भाड्यापोटी राज्य सरकारला दरवर्षी तब्बल 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. हा आर्थिक भुर्दंड वाचवण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी ही इमारत लवकरात लवकर सरकारच्या ताब्यात यावी यासाठी विशेष प्रयत्न केले. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध वास्तूविशारद कंपनीचे जॉन बुर्गी यांनी या इमारतीची रचना केली आहे. 1974 मध्ये राज्य सरकारच्याच जमिनीवर ही इमारत उभारण्यात आली होती. 22 मजल्यांची ही इमारत ताब्यात आल्यानंतर शासकीय कार्यालयांसाठी तब्बल 46 हजार 470 चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे. समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या मोक्याच्या जागेमुळे अनेक मंत्र्यांनी आपली कार्यालये या इमारतीत हलवण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी व पाठपुरावा सुरू केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर