ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

शेतकऱ्यांवर मोठा अन्याय:उत्पादन खर्च 20 रुपये अन् खरेदी दर फक्त साडेबारा रुपये, लासलगावातून रोहित पवार आक्रमक

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


केंद्र सरकारने कांद्याची खरेदी प्रतिक्विंटल 1235 रुपये (12 रुपये 35 पैसे प्रतिकिलो) या अत्यंत तोकड्या दराने करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा खरेदी दर अत्यंत अपुरा असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केंद्र सरकारच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून सरकारवर जोरदार टीका केली आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे लासलगाव येथे दाखल झाले असून ते शेतकऱ्यांशी संवाद साधून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांवर अन्याय सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. रोहित पवार म्हणाले, आज जो शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे तो अन्याय कमी झाला पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे. आज शेतकऱ्यांनी स्वतः कष्टाने पिकवलेला कांदा आहे त्याला कुठे तरी 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये काही शेतकऱ्यांना तर एक रुपया अशा पद्धतीने भाव मिळत असेल आणि उत्पादनाचा खर्च हा कमीत कमी 20 रुपये किलो पेक्षा जास्त आहे. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, असे असताना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की आम्ही साडे 12 रुपयांनी कांदा खरेदी करू तो सुद्धा 2 लाख टन. म्हणजे रब्बीचा कांदा जर आपण पाहिला तर 70 लाख टन कांदा बनतो आणि हे 2 लाख टन तुम्ही घेणार आणि नाफेडकडून घेणार तर घेणार तुम्ही डायरेक्ट दिल्ली आणि मार्केटला जाऊन विकणार. तर उद्या जाऊन जे रेट वाढणार आहेत ते सुद्धा रेट आमच्या शेतकऱ्यांचे वाढणार नाहीत. त्यामुळे इथे आज शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहोत आणि त्यांच्यासोबत चर्चा करून पुढे काय करायचे याचा निर्णय घेणार आहोत. मात्र, आज अतिशय वाईट परिस्थिती आहे. लासलगाव जे महाराष्ट्रातील ठराविक जे मोठे मार्केट कमिटी आहे त्यातली एक आहे. त्यामुळे इथे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आपला कांदा घेऊन येत असतो. त्यामुळे इथे शेतकरी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधून पुढे काय करायचे हे आम्ही ठरवणार आहोत, असे रोहित पवारांनी स्पष्ट केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर